पुणे: आंबेगाव पोलिसांकडून पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक,१ पिस्टल व १ जिवंत राऊंड जप्त,

PUNE CRIME BEAT( PCB ) पुणे:आंबेगाव पोलिसांनी सापळा रचून 
पिस्टल बाळगणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे, इसम बेकायदेशीर पिस्टलसह फिरत होता. पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवून योग्य वेळ साधून सापळा रचला आणि त्याला अटक केली. सध्या पोलिसांनी  पिस्टल जप्त केली असून त्याच्याकडून या प्रकरणातील अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इसम पिस्टल कशासाठी वापरणार होता, त्याचा मागील रेकॉर्ड काय आहे, तसेच पिस्टल कोठून आणि कशी मिळवली, याचा तपास सुरू आहे.

अधिक माहिती अशी की,
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोबींग ऑपरेशन व गुन्हे प्रतिबंधक चे अनुषंगाने गस्त करणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने आंबेगाव पोलीस स्टेशनचे हददीत मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री. शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी प्रियंका गोरे हे तपास पथकासह असे दत्तनगर परीसरात गस्त करीत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आई श्री व्हीला अपार्टमेंटचे बाजुला एका गाईच्या गोठ्यामध्ये एक इसम अंगात काळ्या रंगाचा गोल गळयाचा हा टी शर्ट व काळी ट्रक पॅन्ट,असलेल्या इसमाकडे पिस्टल आहे. वरील बातमीप्रमाणे माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचून एका इसमास ताब्यात घेण्यात आले,

ताब्यात घेतलेल्या इसमाचे नावे,
१) आर्यन बापू बेलदरे, वय १९ वर्षे, काम शिक्षण, रा. आंबेगाव ब्रु, पुणे

सदर इसमांचे ताब्यात एकुण रु.४०,१००/- रुपये किंमतीचा एक पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळुन आले आहे. त्यांचे विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे, वर नमुद इसमास अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो, मा. पोलीस उपआयुक्त साो, परिमंडळ-२ पुणे शहर, मा. राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त साो, स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, प्रियंका गोरे सपोनि, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांचे पथकाने केली.

Post a Comment

0 Comments