PUNE CRIME BEAT( PCB )
सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये १ वर्षापासून फरार असलेल्या महिलेला,गोपालगंज बिहार, येथून पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,
अधिक माहिती अशी की
सायबर पोलीस ठाणे येथे फेब्रुवारी, २०२४ येथे पुणे शहरातील नामाकिंत बिल्डर बोलतो असे सांगुन संबंधित कंपनीच्या अकाऊंटंट व्यक्तिद्वारे नामार्कित बिल्डरच्या खात्यातुन एकुण ४,०६,१७,३१६/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली म्हणुन सायबर पोलीस ठाणे येथे गु.र.नं.७२/२०२४ भारतीय दंड विधान संहिता कलम ४१९,४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (डी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची महिला आरोपी सायबर ठगी सानिया उर्फ गुड्डीया मोहम्मद मुस्तकीम साहब सिद्दीकी पळुन गेल्यानंतर स्वतःचे अस्तित्व लपवुन वेगवेगळे मोबाईल नंबर वापरुन राहत होती. सुमारे ०१ वर्षापासुन ती फरार असल्यामुळे मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सदर गुन्ह्याचा स्वतः आढावा घेऊन त्याबाबत मार्गदर्शन केले सायबर तपास पथकाने दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचे गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करुन सदर सायबर ठगी महिला दिल्ली येथे असल्याचे माहिती मिळाल्याने मा. पोलीस उपआयुक्त श्री. विवेक मासाळ, आर्थिक व सायबर, गुन्हे शाखा पुणे यांनी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोउपनिरी संदिप कदम, मपोहवा सिमा सुडीत, मपोहवा निलम साबळे, पोलीस अंमलदार संदिप पवार, सचिन शिंदे यांना गुन्ह्याच्या तपासकामी तात्काळ दिल्ली येथे रवाना केले. सदर तपास पथकाने न्यु दिल्ली येथिल स्थानिक पोलीसांच्या मदतीने जामीयानगर भागात सायबर ठगी सानिया उर्फ गुड्डीया हिचा शोध घेतला तेथिल महत्त्वाची माहिती तसेच पोलीस अंमलदार अश्विन कुमकर याला सिवान बिहार येथुन मिळालेल्या माहितीत सानिया उर्फ गुड्डीया हि गोपालगंज भागात असल्याची खात्रीशीर माहिती मिळुन आल्याने तपास पथकाने तात्काळ क्षणाचा विलंब न करता दिल्ली ते गोपालगंज, बिहार गाठले. तेथे गुप्त बातमीदार व इतर महत्वाच्या माहिती द्वारे सायबर ठगी सानिया उर्फ गुड्डीया ही राहत असलेल्या लोहरपत्ती, थावे गोपालगंज याठिकाणी वेशांतर करुन जवळच्या शेतात रात्रभर दबा धरुन बसुन तिच्या राहते घरात प्रवेश केला असता ती राहते घराच्या छतावरुन उडी मारुन पळुन जात असताना तिस शिताफीने पकडुन तिस अटक करण्यात आली आहे.
सायबर पोलीस स्टेशन यांनी सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे (गुन्हे) पुणे शहर, मा. पोलीस उप- आयुक्त श्री. विवेक मासाळ आर्थिक व सायबर पुणे शहर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मच्छिंद्र खाडे, आर्थिक व सायबर पुणे, श्री सुरेश शिंदे, वपोनि, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक,
सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस उप-निरीक्षक संदिप कदम, म. पोलीस अंमलदार सिमा सुडीत, निलम साबळे, पोलीस अंमलदार मुंढे, कोंडे, संदिप पवार, सचिन शिंदे, दिनेश मरकड, अश्विन कुमकर, नागटिळक, स्वागत पळसे, यांनी सदरची कामगीरी केली आहे.
0 Comments