PUNE CRIME BEAT( PCB )
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी झाल्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर यांनी कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकांना सूचना देऊन मार्गदर्शन केले त्याच अनुषंगाने तपास पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे, आरोपींकडे अधिक तपास केला असता विविध पोलीस स्टेशनकडील १० गुन्हे उघड झाले आहे.
अधिक माहिती अशी की,
कोंढवा पोलीस ठाणे पुणे येथे प्रतीमा हौसिंग सोसायटी येथे एका इमारतीमध्ये ४ फलॅट तीन अनोळखी आरोपी यानी फोडल्याबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यानी सुचना दिल्या होत्या. सदर सुचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्याचे पथक आरोपी यांचा शोध घेत असताना सदर गुन्हा हा आरोपी समीर उर्फ अल्फाज हनिफभाई शेख, वय १८ वर्षे, रा. सैय्यदनगर, हडपसर, पुणे व महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण, वय १९ वर्षे, रा. गाडी तळ हडपसर पुणे व विधीसंघर्षित बालक यांनी केल्याचे पोलीस अंमलदार राहुल थोरात, विकास मरगळे, मयुर मोरे यांनी उघड केले होते. सदर आरोपी पैकी समीर उर्फ अल्फाज हनिफभाई शेख यास दि.१४/११/२०२४रोजी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडुन त्यावेळी १० हजार रुपये किं एक होंन्डा कंपनीची डिओ मोटार सायकल जप्त करुन हडपसर पोलीस ठाणे कडील गुरन. १७१६/२०२४, भादवि कलम. ३०३ (२) प्रमाणे गुन्हा उघड करण्यात आला होता.
नमुद गुन्हयात महया उर्फ महेश काशिनाथ चव्हाण, याने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याबाबतची गुप्त माहिती पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, गणेश चिचकर, अक्षय शेडगे यांना प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या अनुषंगाने आरोपी याच्याकडे तपास करणे असल्याने मा. न्यायालयाकडुन परवानगी घेवुन ताबा घेण्यात आला होता प्राप्त माहितीच्या अनुषगाने त्याच्याकडे तपास करुन त्याने कोंढवा पुणे येथे घरफोडीचे ६ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडुन सदर घरफोडी चोरीतील सोन्याचे दागिणे रोख रक्कम व असा एकुण १,३१,६४०/-रु कि मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर आरोपी यांच्याकडुन चोरीच्या चार मोटारसायकली असा एकुण किंमत ३.०९.७९६/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त केला वर नमुद आरोपी याच्याकडुन विविध पोलीस स्टेशनकडील गुन्हे उघड झाले आहे.
१) पिंपरी पोलीस ठाणे, येथील १ गुन्हे.
२) हडपसर पोलीस ठाणे,येथील १ गुन्हे.
३) भारती विदयापीठ पोलीस ठाणे येथील १ गुन्हे.
४)कोंढवा पोलीस स्टेशन येथील ७ गुन्हे उघडकीस आले आहे
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्वे प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.०५ श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पो उप निरी बालाजी डिगोळे, अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत जाधव, गणेश चिचकर, अभिजीत रत्नपारखी, राहुल थोरात, राहुल रासगे, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली आहे.
0 Comments