दिनांक ०६/०२/२०२४ रोजी , गुजरवाडी रोड, कात्रज, पुणे येथे फिर्यादी यांचे घराचे दरवाजा कुलुप बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने कुलुप तोडून घरात प्रवेश करून फिर्यादीचे घरातील किं रु १,४६,२५०/- रु चे सोन्याचे दागिने चोरून नेले त्याच कालावधीमध्ये सदर चोरटयाने फिर्यादीचे बिल्डींगमधील इतर फलॅटचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न केलेला होता. तसेच सदर चोरटयाने फिर्यादीचे सदर सोसायटी मधील बंद घराचे कुलूप तोडून २,३७,५००/- रुचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केले म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १२१/२०२४, भादंवि कलम ४५४,३८०,५११ गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे शोध घेणेकरता गुन्हयाचे घटनास्थळाचे तसेच आजुबाजुचे ठिकाणाचे सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे पाहणी करीत असताना एक संशयीत इसम घटनास्थळावर दिसुन आला. त्या संशयीत इसमाचा पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे यांनी घटनास्थळ खोपडेनगर या ठिकाणापासुन राजगुरुनगर, खेड, लोणावळा, व वडगाव मावळ या ठिकाणापर्यंतचे सुमारे ३०० सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे पाहणी केली असता त्यांना सदरचा संशयीत इसमाचे नाव सुदर्शन विष्णुकांत चंद्रपाटले, वय ३० वर्षे, रा. दिग्विजय कॉलनी, ता. मावळ, जि. पुणे मुळ गाव मु.पो वडगळ नागनाथ, ता. चाकुर, जि. लातुर याने केला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदरचा आरोपीचा शोध घेत असताना तो वडगाव मावळ या ठिकाणी मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १२/०२/२०२४ रोजी अटक केली आहे. आरोपीचे पोलीस कस्टडी दरम्यान त्याचेकडुन खालील प्रमाणे ५ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन त्याचेकडुन ५६ ग्रॅम वजनाचे एकुण १,२७,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती मंगल मोडवे, सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचिन गाडे, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, निलेश खैरमोडे, सतिश मोरे, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.