पुणे क्राईम बीट
पुणे क्राईम बीट ताज्या बातम्या
https://youtu.be/YD0oobGDA78
खडक पोलीस स्टेशन यांच्यावतीने,
श्री संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त, यांच्या अध्यक्षतेखाली, समुपदेशन कार्यशाळा आयोजित.
पीसीबी, गुन्हे शाखा, पुणे शहर अंतर्गत एमपीडीए कारवाई:
दिनांक 08/07/2023 रोजी दुपारी 12:30 चे दरम्यान कै. आनंदराव बागवे सांस्कृतिक भवन समाज मंदिर काशेवाडी येथे खडक पोलीस स्टेशन यांच्यावतीने माननीय श्री संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली काशेवाडी येथील अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता व गुन्हेगारी याबाबत समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी 1)शितल अस्तित्व - डॉ. गायत्री कोटबागी 2) मनोदय दे एडिक्शन सेंटर- डॉ. विष्णू श्रीमंगले, मैत्री पांडे 3) तेरे देव होम्स - मंदार शिंदे यांचे उपस्थितीत काशेवाडी भवानी पेठ परिसरातील अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात आहेत अशा मुलांचे परिवर्तन करण्याकरिता मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी, श्री अशोक धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त फरसखाना विभाग, श्री.विनय पाटणकर पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन तसेच माजी नगरसेवक अविनाश बागवे, संदीप लडकत, भारत कांबळे, अर्चना पाटील यांचे सह खडक पोलीस स्टेशन कडील शांतता समिती, मोहल्ला समिती, अल्पसंख्याक समिती, महिला दक्षता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व अल्पवयीन मुलांचे पालक हजर होते.जनसमुदाय 100 ते 120 जन उपस्थित होते.
सुनील माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खडक पोलीस स्टेशन पुणे शहर
पोलीसांनी दोन जणांना केली अटक
पुण्यातील सहकारनगर परिसरात कोयता गँगने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच कोयता गँगने पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे. टोळक्याने भर रस्त्यात गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.
सध्या टोळक्यांचा वाढदिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका टोळक्याने भर चौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. हा केक कापत असताना टोळक्यांनी या ठिकाणी धिंगाणा घातला. तसेच आरडाओरडा करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दोन जणांना अटक केली आहे. टोळक्यांचा सातत्याने धुडगुस सुरू असल्याने पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला की नाही? पोलीस टोळक्यांना कधी व्यसन घालणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकास आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक सुरेश कांबळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरर्णी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी व पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक सुरेश कांबळे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्भलिंग निदान प्रकरणात गाजलेले बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पाठवून भूम येथील ३० वर्षाच्या तरुणाने बुधवारी पहाटे आत्महत्या केली. फैय्याज दाऊद पठाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी यांच्या खासगी वाहनावर चालक होता. या डॉक्टरच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागला. त्यानंतर फैय्याजने पानटपरी सुरू केली. पुन्हा कामावर ये अन्यथा स्वामी यांचे पैसे परत कर, अशी धमकी सुरेश कांबळे व त्याचे साथीदार देत होते. त्यातून ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येते.सुरेश कांबळे हे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर तातडीने पोलीस कारवाई व्हावी अशी फैय्याज पठाण यांच्या नातेवाईकांची मागणी आहे.
0 Comments