पुणे क्राईम बीट
पुणे क्राईम बीट ताज्या बातम्या
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी
दिनांक २६/०६/२०२३ रोजी ते दिनांक ०९/०७/२०२३ रोजीचे पहाटे ०५.३० वा. दरम्यान फिर्यादी हे लग्नामध्ये डान्सचे कार्यक्रमाकरता गुजरात येथे गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे मुख्य दरवाज्याचे लॉक कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधुन ५,६०,०००/- रुपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चेन, तसेच ७,५०,०००/- रुपये रोख असा एकुण १३,१०,०००/- रुपये किंमतीचा माल लबाडीच्या इरादवाने चोरी केला आहे म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५४ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नाम शुभम अशोक माने, वय २३ वर्षे, धंदा नोकरी, रा. सध्या, मांगडेवाडी, कात्रज, पुणे मुळ रा., धनकवडी पुणे याने केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीताचा शोध घेवून त्यास दिनांक ०९/०७/२०२३ रोजी अटक केली आहे. आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता त्याचेकडुन गुन्हयातील फियांदी यांचे चोरी केलेले ५,६०,०००/- रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चेन, ५,३७,००००/- रुपये रोख रक्कम व एक १,२५,०००/- रुपयांचा सॅमसंग कंपनीचा एस. २३ अल्ट्रा, लोखंडी रॉड, चावी असा एकुण १२,२२,०००/- (बारा लाख बावीस हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सगो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक + (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.
वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
घातक शस्त्रांचा तसेच आत्याधुनिक साधनांचा वापर करुन बॅक फोडणारे दरोडेखोर टोळीस अटक
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनचे मार्शल यांना डायल ११२ वर त्वरीत प्रतिसाद देणेबाबत मा.श्री.विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केले असुन त्या अनुषंगाने जनमाणसातील पोलीसांची प्रतिमा व त्यांचे विषयी विश्वासअहंता निर्माण होईल याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत. जेणेकरुन पोलीस काम करीत असताना त्यांचे बद्दल आदर निर्माण होईल.
दि.०९/०७/२०२३ रोजी रात्रौ ०१.२८ वा एमडीटीवर, डांगे चौकाजवळील गणपती मंदीर शेजारी असलेले फेड बँक येथे चोरी होत असून पोलीस मदत पाहीजे अशा प्रकारचा कॉल प्राप्त झालेने. तात्काळ वाकड मार्शल व थेरगाव मार्शल असे दोन्ही मार्शल ०५ मिनीटाचे आत घटनास्थळी जावुन कॉलर यास फोन करुन माहीती घेतली असता त्याने सांगीतलेले दोन बंद गाळयातील एका गाळयाचे शटर अर्धवट उघडे दिसले त्यामुळे मार्शलला असलेले पोलीस अंमलदार यांनी शटरजवळ पाहणी केली असता फेडरल बँकेचे एका भिंतीस मोठे होल पडलेले दिसले. त्यामुळे मार्शलने अंधारात पाहणी केली असता अचानक ०८ अनोळखी दरोडेखोर शस्त्रांसह पोलीस अंमलदारावर चालून आले त्यांना पोलीस अंमलदारांनी जोरदार प्रतिकार करुन ०४ दरोडेखोरांना ताब्यात घेतले. उर्वरीत ०४ दरोडेखोर पळुन जात असताना त्याचे पाठलाग करणारे पोशि सोणवणे हे पडुन जखमी झाले आहेत.
सदरचे पकडलेले ०४ दरोडेखोरांकडे कसून तपास केला असता त्यांनी आपण फेड बँक फोडण्यासाठी सर्व साहीत्य व शस्त्रांसह आलो होतो व बँक फोडणेचे प्रयत्नामध्ये असताना पोलीसांची आम्हाला चाहुल लागलेने आम्ही अंधाराचा फायदा घेवुन दडुन बसलो परंतु पोलीस आम्हाला शोधत आहे असे पाहुन त्यांचेवर शस्त्रांसह प्रतिकार करुन तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न केला असे सांगीतलेने लागलीच तात्काळ वाकड मार्शलला नेमलेले पोशि.
कांबळे यांची फिर्याद घेवुन ०४ आरोपींना अटक केली असुन (डॉ. काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड(डॉ. काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड उर्वरीत ०४ आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींकडुन मोठया प्रमाणावर बँक फोडणेसाठी लागणारे गॅस कटर, गॅस सिलेंडर, स्कु ड्रायव्हर, लोखंडी अवजारे, भिंत फोडणेसाठीचे गिरमीट असे साहीत्य जप्त करणेत आले असून अधिक तपास करीत आहोत. गुन्हयातील पळुन गेलेले ०४ दरोडेखोरांचा शोध घेणेकरीता गुन्हे शोध पथकाचे दोन टिम तयार केले असुन त्यांना योग्यत्या सुचना देवून रवाना केले आहेत. तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आपले हद्दीत नाकाबंदी करुन संशयीतांचा कसून शोध करणेबाबत आदेश दिले आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो पोलीस उप आयुक्त परि २, मा. श्री. डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, सपोनि. अनिल लोहार, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि कौर्तेय खराडे, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि रमेश खेडकर, पोशि, विनोद सोणवणे, पोशि नागनाथ कांबळे, पोशि खोडदे, घाडगे यांनी मिळून केली आहे.
खडक पोलीस स्टेशन यांच्यावतीने, संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त, यांच्या अध्यक्षतेखाली, समुपदेशनकार्यशाळा आयोजित.
पुणे : सुप्रसिद्ध शाळेतील मुलींच्या टॉयलेटमध्ये CCTV कॅमेरे, पुण्यातील घटना; हिंदुत्त्वादी
संघटनेकडून प्रिन्सिपलला मारहाण, व्हिडिओ व्हायरल:
पुण्यातील एका महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तळेगावमधील डॉ. डी. वाय. पाटील
महाविद्यालयात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पुण्यातून एक धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. तळेगावमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील
(Dr. D. Y. Patil College) लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही आहेत आणि तिथं ख्रिश्चन समाजाची प्रार्थना का घेतली जाते? असे
दोन आरोप करून महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले
आहेत. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा, अशी मागणी सध्या केली जात आहे. सादर घटना दोन दिवसांपूर्वी
घडली आहे
पीसीबी, गुन्हे शाखा, पुणे शहर अंतर्गत एमपीडीए कारवाई:
दिनांक 08/07/2023 रोजी दुपारी 12:30 चे दरम्यान कै. आनंदराव बागवे सांस्कृतिक भवन समाज मंदिर काशेवाडी येथे खडक पोलीस स्टेशन यांच्यावतीने माननीय श्री संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली काशेवाडी येथील अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता व गुन्हेगारी याबाबत समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी 1)शितल अस्तित्व - डॉ. गायत्री कोटबागी 2) मनोदय दे एडिक्शन सेंटर- डॉ. विष्णू श्रीमंगले, मैत्री पांडे 3) तेरे देव होम्स - मंदार शिंदे यांचे उपस्थितीत काशेवाडी भवानी पेठ परिसरातील अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात आहेत अशा मुलांचे परिवर्तन करण्याकरिता मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी, श्री अशोक धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त फरसखाना विभाग, श्री.विनय पाटणकर पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन तसेच माजी नगरसेवक अविनाश बागवे, संदीप लडकत, भारत कांबळे, अर्चना पाटील यांचे सह खडक पोलीस स्टेशन कडील शांतता समिती, मोहल्ला समिती, अल्पसंख्याक समिती, महिला दक्षता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व अल्पवयीन मुलांचे पालक हजर होते.जनसमुदाय 100 ते 120 जन उपस्थित होते.
सुनील माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक
खडक पोलीस स्टेशन पुणे शहर
पोलीसांनी दोन जणांना केली अटक
पुण्यातील सहकारनगर परिसरात कोयता गँगने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच कोयता गँगने पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे. टोळक्याने भर रस्त्यात गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.
सध्या टोळक्यांचा वाढदिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका टोळक्याने भर चौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. हा केक कापत असताना टोळक्यांनी या ठिकाणी धिंगाणा घातला. तसेच आरडाओरडा करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दोन जणांना अटक केली आहे. टोळक्यांचा सातत्याने धुडगुस सुरू असल्याने पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला की नाही? पोलीस टोळक्यांना कधी व्यसन घालणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकास आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..!
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक सुरेश कांबळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरर्णी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी व पालकमंत्री
तानाजी सावंत यांचे समर्थक सुरेश कांबळे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
गर्भलिंग निदान प्रकरणात गाजलेले बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पाठवून भूम येथील ३० वर्षाच्या तरुणाने बुधवारी पहाटे आत्महत्या केली. फैय्याज दाऊद पठाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी यांच्या खासगी वाहनावर चालक होता. या डॉक्टरच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागला. त्यानंतर फैय्याजने पानटपरी सुरू केली. पुन्हा कामावर ये अन्यथा स्वामी यांचे पैसे परत कर, अशी धमकी सुरेश कांबळे व त्याचे साथीदार देत होते. त्यातून ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येते.सुरेश कांबळे हे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर तातडीने पोलीस कारवाई व्हावी अशी फैय्याज पठाण यांच्या नातेवाईकांची मागणी आहे.


0 Comments