पुणे शहरातील तळजाई वसाहत परिसरामध्ये खुनी हल्ला (Attempt To Murder In taljai )करुन दहशत पसरवणाऱ्या टोळीवर गँगच्या म्होरक्यासह 6 जणांवर मोक्का अंतर्गत MCOCA (Mokka Action) कारवाई करण्यात आली होती. मोक्का गुन्ह्यातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) न्यायाधीश एम.एस. कर्णिक (Judge M.S. karnik) यांनी जामीन मंजूर (Bail Granted In MCOCA Case) केला आहे. (Pune Crime News) अशी माहिती आरोपीचे वकील विकास शिवरकर (Adv.vikas shivarkar) व अॅड. मंगेश जोगदंड (Adv. M.A. jogdand ) व अँड अक्षय दिवाने यांनी दिली. प्रेम गणेश चांदणे (prem ganesh chandane) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.
किरकोळ कारणावरुन एकावर धारदार हत्यारांनी वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात, IPC 307, 504, 506, 427, 201, 188 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act), महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा (मोक्का) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ऑगस्ट 2022मध्ये तळजाई परिसरात घडला होता. या गुन्ह्यातील आरोपी प्रेम गणेश चांदणे याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आरोपीने अॅड. विकास शिवरकर व अॅड.मंगेश जोगदंड यांच्या मार्फेत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. यावर नुकतीच सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान अॅड. विकास शिवरकर यांनी युक्तीवाद करताना सांगितले, की आरोपीला या गुन्ह्यात खोट्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे असून त्याने अशा प्रकारचा कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच या गुन्ह्यात आरोपीची कोणतीही स्पष्ट भूमिका दिली नसल्याने व आरोपी हा मागील एक वर्षापेक्षा जास्त काळ कारागृहात आहे. त्यामुळे आरोपीचा जामीन मंजूर करावा, असा युक्तिवाद अॅड.विकास शिवरकर व अॅड. एम.ए. जोगदंड,व अँड. ए. एस.दिवाने. यांनी केला.
न्यायालयासमोर ठेवण्यात आलेल्या पुराव्याचा विचार करुन न्यायालयाने असे निष्कर्ष नोंदविले की,
या गुन्ह्यात आरोपीला कोणतीही स्पष्ट भूमिका दिली नाही. तसेच फर्यादीनुसार आरोपी (अर्जदार) हा
संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. ही टोळी सोनू धडे याने तयार केली होती. मात्र, प्रथमदर्शनी
यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला
जामीन मंजूर करण्यात येत आहे.
आरोपीच्या वतीने अॅड.विकास शिवरकर , अॅड. मंगेश जोगदंड (Adv. Mangesh jogdand) व अॅड. अक्षय दिवाने (Adv. Akshay Diwane) यांनी काम पाहिले.
0 Comments