PUNE CRIME BEAT(PCB NEWS)
पुण्यातील चव्हाणनगर कमान परिसरात मोबाईल दुकानामध्ये झालेल्या चोरीच्या घटनेत सहकारनगर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ६५ मोबाईल फोन, ज्यांची किंमत १७ लाख ८२ हजार रुपये आहे, जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात सहकार नगर पोलिसांकडून आंतरराज्यातील घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते जप्त मोबाईल फोन फिर्यादींना परत करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की
दि.१४/०७/२०२४ रोजी फिर्यादी यांचे चव्हाणनगर कमानी शेजारी असलेले मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटुन आतमध्ये प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन चोरुन नेले होते. त्याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २४६/२०२४ भा. न्या. संहिता कलम ३०५,३३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे तपासात घरफोडीतील आरोपी नामे १) मोबीन मुन्ना देवान वय ३६ वर्षे रा. बिरता चौक बसननगर, ठाणा घोडासन राज्य बिहार २) अरुण किशोरी सहा वय ५२ वर्षे रा. वार्ड नं १७ मोतीहारी मठिया डीह , ठाणा छतावणी राज्य बिहार ३) शमसाद आलम सरजउल अन्सारी वय ३६ वर्षे रा. अठमुहाण जिल्हा मोताहारी ठाणा झादौखद राज्य बिहार यांना ताब्यात घेवुन सहकारनगर पोलीस स्टेशन कडील दाखल गुन्ह्यात अटक करुन सदर आरोपीकडुन एकुण १७,८२,४७९/- रु.कि.चे.विविध कंपनीचे एकुण ६५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते.
0 Comments