PUNE CRIME BEAT( PCB NEWS ) 
दिनांक २०/१२/२०२४ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय भापकर यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीतील फालेनगर, येथे अवैध्द गुटख्याची टॅम्पोमधुन वाहतुक होत आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २. पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, यांना कळविल्याने मा. वरीष्ठांनी मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ  २, पुणे शहर यांचे कार्यालयाकडील पोलीस अधिकारी सपोनि संतोष कोळी, व पोलीस अंमलदार पंकज माने, स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार राहुल तांबे, कुंदन शिंदे, सागर केकाण तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी निलेश मोकाशी, तपास पथकाचे अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलीग करुन बातमी प्रमाणे कोठे टेंम्पोतुन गुटख्याची वाहतुक होत आहे याबाबत खात्री करुन कारवाई करणेबाबत कळविले.

त्यानुसार नमुद सर्व अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना फालेनगर, लेन नंबर ५, फालेनगर येथील राजन प्रोव्हीजन स्टोअर्स या दुकानाचे समोरील बाजुचे रोडच्या कडेला इसम नामे १. सौरभ ऊर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर, वय २४ वर्षे, रा.श्रीराम सोसायटी, आय विंग फ्लॅट नंबर ५, थोरवे शाळेसमोर, पुणे २. संग्राम रामकृष्ण निंबाळकर, वय २६ वर्षे, रा. श्रीराम सोसायटी, आय विंग फ्लॅट नंबर ५, थोरवे शाळेसमोर, पुणे हे दोघेजण त्यांचे ताब्यातील टेंम्पो यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला विमल पान मसाला गुटख्याचा,आठ लाख अठावन्न हजार रुपये माल विक्री करता बाळगताना मिळुन आला आहे. नमुद इसमांकडुन १० लाख रुपये किंमतीचे दोन टॅम्पो व,आठ लाख अठावन्न हजार रुपये किंमतीचा माल असा एकुण  अठरा लाख अठावन्न हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला असुन आरोपींचे विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नंबर १०६५/२०२४, भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १२३,२७४, २७५, २२३ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ), २६ (२) (१),२६ (२) (४) अंतर्गत कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे दाखल गुन्हयाचा पुढील तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमितेश कुमार, मा.पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २ कार्यालयाकडील सपोनि संतोष कोळी, स्वारगेट पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार संजय भापकर, कुंदन शिंदे, राहुल तांबे, सागर केकाण व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.