पुणे राजगुरुनगर, दोन लहान मुलींचे लैंगिक अत्याचार करून खून,५४ वर्षीय नराधमाला अटक.

पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय ५४ वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. नराधम आरोपीने मुलींचा खुन करुन परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलीसांनी पुण्यातून आरोपीला अटक केली आहे. आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा असून गेल्या नऊ वर्षांपासून तो पुण्यात राहत होता. आरोपी पीडित कुटुंबियांच्या घराच्या वरच्या बाजूला राहत होता अजय दास असे नराधम आरोपीचे नाव आहे.

 नराधम आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना, पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
त्याने हे कृत्य केल्याचं देखील कबूल केलं आहे. चौकशीमध्ये आरोपीने त्या लैंगिक अत्याचार करून पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचे कबूल केले आहे.

श्री पंकज देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी सांगितले हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल,
आरोपपत्र लवकरात लवकर दाखल होईल याची आम्ही खात्री करू आणि राज्य महिला आयोग आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार आहे.

Post a Comment

0 Comments