पुणे: वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला हडपसर गाडीतळ येथून युनिट ५ गुन्हे शाखा यांच्या पथकाने घेतले ताब्यात,

(PCB NEWS) दि.३/१२/२०२४ रोजी युनिट ५ कडील  पोलीस स्टाफ हडपसर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रामध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत  असताना गांधी चौकाजवळ, पुलाखाली , हडपसर गाडीतळ, पुणे या ठिकाणी संशयित इसम  नामे प्रमोद मोहन सोनटक्के राहणार डीपी रोड, माळवाडी, हडपसर, पुणे मूळ राहणार मुक्काम पोस्ट येणेगुर , तालुका उमरगा , जिल्हा धाराशिव  हा  मोटरसायकल सह संशयित  रित्या मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता नमूद आरोपीने हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1828/2014 भारतीय न्याय संहिता कलम  303(2) प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले असून दाखल गुन्ह्यातील  चोरीस गेलेले वाहन गुन्ह्याचे पुरावे कामी जप्त करण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी   मा सहाय्यक पोलीस आयुक्त  गुन्हे २ श्री.राजेंद्र मुळीक  यांचे सूचना व मार्गदर्शन प्रमाणे युनिट ५ कडील पोलीस निरीक्षक श्री.युवराज हांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार शहाजी काळे, प्रमोद टिळेकर व  अमित कांबळे, स्वामी यांचे पथकाने केलेली आहे.

Post a Comment

0 Comments