PUNE CRIME BEAT (PCB NEWS )
युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर.
आंबेगाव बुद्रुक लिपाणे वस्ती कात्रज पुणे येथील stylox fashion hub या शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात puma या ब्रॉडेड कंपनीचे लोगो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॅाव्हझर, बॉक्सर पॅन्ट विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट २ यांना मिळाली, त्याच अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली stylox fashion hub या शॉप वर छापा मारून,
puma या ब्रॉडेड कंपनीचे लोगो वापरुन विक्रीसाठी ठेवलेले सर्व सामान गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आले आहे, सर्व मुद्देमालाची किंमत ८ लाख २ हजार ६०० आहे, शॉप मालक याचेवर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51,63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुणे शहरात वेगवेळया ठिकाणी ब्रॉन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत असलेबाबत माहिती मिळाली होती. त्या अनुषंगान कारवाई करणेकामी मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 2 प्रभारी प्रताप मानकर,यांचे पथकातील अधिकारी अंमलदार Puma कंपनीचे अधिकृत प्रतीनिधी मार्फत पुणे शहरात शोध मोहिम चालू असताना प्राप्त माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक लिपाणे वस्ती कात्रज पुणे येथील stylox fashion hub या शॉपमध्ये मोठया प्रमाणावर puma या ब्रॉडेड कंपनीचे लोगो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॅाव्हझर, बॉक्सर पॅन्ट विक्री चालू होती त्याप्रमाणे सदर माहितीची खात्री केली.
दिनांक 3/12/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पथकाने आंबेगाव बुद्रुक निपानी वस्ती कात्रज पुणे येथील stylox fashion hub या शॉपमध्ये छापा कारवाई केली असता सदर शॉपमध्ये एकुण 8,02,600 रु.चा किमंतीचा puma या ब्रॉडेड कंपनीचे लोगो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोटस शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॅाव्हझर, बॉक्सर पॅन्ट असा मुददेमाल जप्त केला असून शॉप मालक याचेवर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक 1018/2024 कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51,63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी,मा.सहा.पोलीस आयुक्त गुन्हे 1 श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री.प्रताप मानकर,सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक नितिन कांबळे, पोलीस अंमलदार शंकर नेवसे, अमोल सरडे, ओमकार कुंभार, संजय आबनावे,विनोद चव्हाण ,पुष्पेद्र चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, प्रमोद कोकणे,निखिल जाधव,गणेश थोरात नागनाथ राख या पथकाने केली आहे.
0 Comments