PUNE CRIME BEAT (PCB NEWS ) तर्फे विष्णू ताम्हणे सरांना हार्दिक अभिनंदन.
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, बस्लटन येथे १डिसेंबर रोजी Ironman ही स्पर्धा आयोजित केली होती.सदर स्पर्धेत या पूर्वी पुणे शहर येथे
कार्यरत असलेले व सध्या
ठाणे आयुक्तालय मधिल उल्हासनगर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु नाथा ताम्हाने यानी सहभागी होउन ती पूर्ण करणे ही केवळ एक व्यक्तिगत कामगिरी नसून, संपूर्ण पोलीस दलासाठी गौरवशाली बाब आहे. 3.8 किमी जलतरण, 180 किमी सायकलिंग, आणि 42.2 किमी धावणे हे एकाच दिवशी पूर्ण करणे, हे मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कळस गाठणारी व कस लागणारी गोष्ट आहे.
त्यानी आपल्या कर्तृत्वाने शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती साठी पोलीस दलातील बांधवांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. धैर्य, संयम, नियोजन आणि शिस्त यांतून आपले इच्छित ध्येय गाठने शक्य होते याचे मूर्तिमंत उदाहरण त्यांची कामगिरी ठरली आहे.
या बद्दल पोलिस दल व नगारिक मधुन त्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments