पुणे -भारती विद्यापीठ पोलिसांकडून वाहन चोराला अटक, आरोपीकडून ११ दुचाकी वाहने जप्त.

पुणे क्राईम बीट:-भारती विद्यापीठ पोलिसांनी एका वाहन चोराला अटक केली आहे, त्याच्याकडून ११ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भारती विद्यापीठ पोलिसांना सूचना दिल्या होत्या, भारती विद्यापीठ परिसरामध्ये पेट्रोलिंग गस्त वाढवण्यात यावे, येथील परिसर हे गर्दीचे असून या ठिकाणी, भारती हॉस्पिटल, कॉलेज, होस्टेल ,असल्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांची व नागरिकांचे दुचाकी वाहने पार्क केलेली असतात त्याच अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील यांनी  पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस हे पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम चोरीचे वाहन घेऊन सातारा रोड येथील लोखंडी पुलाच्या येथे थांबलेला आहे, सदरची माहिती पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना कळवून, आरोपीला मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने त्याच्याकडे असलेली मोटरसायकल ही चोरीची आहे असे कबूल केले, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, आरोपीकडून ६ लाख रुपये किमतीच्या एकूण ११ मोटरसायकल मिळून आल्या आहे, जप्त केलेले गाड्यांबाबत कोठे गुन्हे दाखल आहेत याबाबत तपास चालू आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ६२६/२०२४, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम नमुद गुन्हयातील चोरीस गेले दुचाकी गाडीसह फिरत आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीतांचा शोध घेत असताना सातारा रोडवरील भुयारी मार्गालगतचे लोखंडी पुलाजवळ इसम नामे श्रावण माधव शिंदे, वय २६ वर्षे, रा. साईराम हाईटस, रेणुका पार्क, उबाळेनगर, वाघोली, पुणे हा गुन्हयातील चोरीस गेले दुचाकी मोटार सायकल, हिच्यासह मिळुन आल्याने त्याचेकडे अधिक तपास करता त्यांनी गाडी चोरी केल्याची कबुली दिल्याने ती गाडी पंचनाम्याने जप्त करुन त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे. अटके दरम्यान आरोपीकडे केले तपासामध्ये आरोपीकडुन ६ लाख रुपये किंमतीच्या एकुण ११ दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या असुन सदर गाड्यांबाबत कोठे गुन्हे दाखल आहेत याबाबत तपास चालु आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, हनमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, सतिश मोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, शैलेश साठे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments