पुणे क्राईम बीट:- दिनांक २८/०७/२०२४ रोजी वाघोली येथील चोखीदाणी रोडवरील दुर्गामाता मंदिर येथे रविवारी सायंकाळी ६ ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ हे दोघे भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते, त्या दरम्यान भाजी खरेदी करताना फिर्यादींना आरोपीने जाताना खांद्याला धक्का लागला, त्यावेळेस फिर्यादी म्हणाले जाताना बघत जा, असं बोलल्याने आरोपींना राग आला त्यांनी फिर्यादी व त्याच्या भावाला लाकडी दांडक्याने, लाथा बुक्क्याने बेदम मारहाण केले, आरोपींनी त्यांच्या आणखी मित्रांना बोलावून घेतले, फिर्यादी व त्यांच्या भावाला मारहाण करून जबरदस्तीने स्विफ्ट कार मध्ये बसून,पोदार कॉलेज येथील नवीन बांधकाम साईटवर नेले. गाडीचे नुकसान झाले आहे, असे सांगून त्या बदल्यात पैशांची मागणी केली. फिर्यादी यांचे नातेवाईकाकडून गुगल पेवरुन १८ हजार रुपये गाडीवरील चालकाचे गुगल पे अकाऊंटवर जबरदस्तीने घेतले.
फिर्यादी यांना लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.आमची तक्रार पोलिसात केली तर, तुला आम्ही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली, यासंदर्भात गुन्हे शाखा युनिट ६ यांच्या पथकाने सदर गुन्ह्यांमध्ये ५ आरोपींना अटक केली आहे,
पुढील तपासकामी आरोपींना लोणीकंद पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की.
गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस अंमलदार हे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना,समीर पिलाने, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे, यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, लोणीकंद पो.स्टे.गु.र.नं. ७३४ / २०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२),१४०(३),३५१(२) या गुन्हयातील पाहिजे आरोपी कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर, विकास कांबळे हे आव्हाळवाडी गावचे हद्दीत आव्हाळवाडी ते खराडी रोडवरील बायफ कंपनीजवळ लाल रंगाचे स्वीफ्ट गाडीसह उभे आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी मिळताच स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन त्यांना शिताफीने सापळा रचून ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे १) कुमार मोहन पवार, वय २२ वर्षे, रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे २) नितीन मोहन पवार, वय १९ वर्षे, रा.मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे ३) ओम लक्ष्मण गव्हाणे, वय १९ वर्षे, रा. लेन नं. २. साई सत्यम पार्क, उबाळेनगर, वाघोली, पुणे ४) मनोज सुखदेव निंबाळकर, वय २१ वर्ष. रा. मोरया हॉस्पिटल शेजारी, उबाळेनगर, वाघोली, पुणे ५) विकास दिगंबर कांबळे, वय २१ वर्षे, रा. लेन नं. २६ उबाळेनगर, वाघोली, पुणे त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची स्विफ्ट कार तपासकामी जप्त करण्यात आली आहे.
ही घटना दिनांक २८/०७/२०२४ रोजी वाघोली येथील चोखीदाणी रोडवरील दुर्गामाता मंदिर येथे रविवारी सायंकाळी ६ ते रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ भाजी खरेदी करण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी एका १७ वर्षाच्या मुलाने फिर्यादीच्या खांद्याला धक्का दिला, म्हणून फिर्यादीने पाहून चालत जा, असे म्हणाले. त्याचा राग मनात धरुन त्या मुलाने शुभम जाधव व आनंदा पाटील तसेच आणखी एका साथीदाराने फिर्यादी व त्यांच्या बरोबरील समीर व विवेक अशा तिघांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यांनी फोन करुन आणखी साथीदारांना बोलावून घेतले. त्यांना स्विफ्ट गाडीत जबरदस्तीने बसवून पोदार कॉलेज येथील नवीन बांधकाम साईवर नेले. गाडीचे नुकसान झाले आहे, असे सांगून त्या बदल्यात पैशांची मागणी केली. फिर्यादी यांचे चुलता अजिज अहमद यांचे गुगल पेवरुन १८ हजार रुपये गाडीवरील चालकाचे गुगल पे अकाऊंटवर जबरदस्तीने घेतले.
फिर्यादी यांना लाकडी दांडके, लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी समीश हश्मी यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. समीर याच्या डाव्या हाताला व विवेक गोस्वामी याच्या डोक्यात मारुन जखमी केले. सदरबाबत वरीलप्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे स्वाधीन केले आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा.पोलीस सह-आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपआयुक्त गुन्हे, अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे - २ सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट - ६ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, ऋषिकेश ताकवणे, समीर पिलाने,
ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, शेखर काटे, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, किर्ती मांदळे, प्रतिक्षा पानसरे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.
0 Comments