मा. वरिष्ठांच्या आदेशान्वये युनिट कार्यक्षेत्रात रेकॉर्डवरील गुन्हेगार व टोळीचे सदस्य चेक करणेबाबत युनिट १ अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन रवाना केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद व अंमलदार असे खडक पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगार चेक करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, लक्ष्मीनारायण सोसायटी ८३ भवानी पेठ पुणे येथे प्रतिबंधीत गुटख्याचा साठा करुन ठेवला आहे. आम्ही लागलीच मा. वरिष्ठांच्या परवानगीने श्री शब्बीर सय्यद व युनिट १ कडील पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी जावुन खात्री करुन अचानक छापा टाकला असता इसम नामे १) कामरान मुर्तुजा खान, वय २८ वर्षे, रा. भवानी पेठ, पुणे यांचेजवळ एका फ्लॅट मध्ये किं.रु ७ लाख, ४७ हजार, १८०/- रु चा व २) अमन मोहंम्मद इस्लामुद्दीन, वय ३१ वर्षे, रा. स्वामी समर्थ मंदिरा शेजारी, अंगारची तकीया जवळील वाड्यात, भवानी पेठ पुणे, मुळगाव राज्य उत्तर प्रदेश यांचा ताब्यातील टेम्पो मध्ये ६लाख, ५३हजार, ४००/-रु. किं.चा असा एकुण १४लाख, ५८०/- रु किं. चा विमल पान मसाला, आर.एम. डी माणिकचंद, राजनिवास पान मसाला, रजनीगंधा पान मसाल, तुलसी पान मसाला असा माल मिळुन आला.
सदर आरोपी यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम २२३,२७४, २७५,१२३,३ (१) व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ),२६(२) (1),२६ (२) (IV), अन्न सुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन अॅण्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन२,३,४ चे उल्लंघन, सहवाचन ३ (1)ZZ चे उल्लघंन केल्याने ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास खडक पोलीस स्टेशन येथे चालु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. अमोल झेंडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर, श्री. गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट -१, शब्बीर सय्यद सहा. पो. निरी आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार महेश बामगुडे, आण्णा माने, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश जाधव, अय्याज दड्डीकर, अनिकेत बाबर, विठ्ठल साळुंखे, निलेश साबळे, दत्ता सोनवणे, शुभम देसाई, प्रफुल्ल शेलार यांनी केली आहे.
0 Comments