पुणे: येरवड्यातील मंदिरात दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात येरवडा पोलिसांना यश,

पुणे क्राईम बीट:- दि.४/०६/२०२४ रोजी रात्री १.३० ते  ६ वाजता.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने पर्णकुटी टेकडी, येरवडा पुणे येथील ऐतीहासीक पांडवकालीन तारकेश्वर मंदिराचे मुख्य दरवाजाचे लॉक तोडून त्यावाटे मंदिरात प्रवेश करुन मंदिरातील स्टिलच्या ६ दानपेट्या फोडून त्यातील जमा झालेली अंदाजे २,००,०००/- रुपयाची रक्कम चोरुन नेली होती. त्या बाबत येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल आहे. भादवि ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हयाबाबत पावसाळी अधिवेशन सन २०२४ चे विधान परिषदेमध्ये मंदिरातील चोरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक स्वप्निल पाटिल व पोलीस अंमलदार तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, विठ्ठल घुले यांनी सदर गुन्हयातील पुणे ते अहमदनगर येथील अहिल्यानगरपर्यंत जवळपास २०० सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींचा मार्ग काढला. तसेच पोहवा किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन महत्वाच्या गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. सदर गुन्हयातील संशयीत आरोपी यास रेल्वे स्टेशन, पुणे येथून अतिशय शिताफीने ताब्यात घेवून त्यास नाव पत्ता विचारता स्वरुप राजेश चोपडे वय २१ सध्या रा. मांजरी बुद्रुक पुणे मुळ गाव नागपूर असे सांगितले. त्याचेकडे अधिक तपास करता त्याने इतर साथीदार नामे १. राजन पटेल २. अक्षय शाहू ३. अथर्व वाटकर ४. अमित शिरीया रा. नागपुर शहर यांचेसह सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. गुन्हयातील आरोपी नामे अथर्व वाटकर यांस नागपूर शहर येथून दि.०९/०८/२०२४ रोजी ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयामध्ये दोन आरोपींकडून गुन्हयातील चोरीस गेलेली १,०५,०००/- रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तसेच गुन्हयात वापरलेली ४०,०००/- रु. किंमतीची टिव्हीएस ज्युपिटर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. सदर मोटारसायकल बाबत चंदननगर पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे.

सदर आरोपींकडून एकूण २ गुन्हे उघडकीस आलेले असून एकूण १,०५,०००/- रु. रोख रक्कम व ४०,०००/- रु किंमतीची मोटार सायकल असा एकूण १,४५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, तत्कालीन पोलीस उप-आयुक्त, श्री. विजयकुमार मगर, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, श्री. हिम्मत जाधव मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, वपोनि येरवडा, श्री. रविंद्र शेळके, पोनि गुन्हे, येरवडा छगन कापसे, पोनि गुन्हे, येरवडा पल्लवी मेहेर, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, पो. अमंलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विशाल निलख यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments