पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये अतिरेकी असल्याचा संशय आल्याने फरसखाना पोलिसांनी तीन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहे.

पुणे पोलिसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की ३ लोक हे परप्रांती असून ते पुणे शहरांमध्ये फिरत आहे, 
पुणे पोलिसांकडून तपास चालू करण्यात आला होता, परंतु आज सकाळी पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ते ३ इसम दिसल्याने कमला नेहरू  येथील स्टाफ ने
पोलिसांना फोन केला, पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत, कमला नेहरू येथील स्टाफ  ने संशय व्यक्त केला होता त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे ,हॉस्पिटल मधील  पेशंट व त्यांचे नातेवाईक घाबरले होते  यामध्ये पोलिसांनी सतर्कता बाळगून संशयित तिन्ही इसमांना ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस तपास करत आहे.
संदीपसिंह गिल्ल,डीसीपी परिमंडळ 2 यांनी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments