पुणे:पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ,पोलीस कस्टडीमध्ये झाला होता आरोपीला त्रास.

पुणे क्राईम बीट:-पर्वती पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यामध्ये मुंढवा परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आले होते, सचिन अशोक गायकवाड (वय ४७,रा, मुंढवा) आणि मनोहर रमेश माने (वय ३६, रा. मुंढवा) यांना चोरीच्या गुन्ह्यात ७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अटक केली होती.

दुसर्‍या दिवशी त्यांना न्यायालयात  हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली. दोघांना विश्रामबाग पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सचिन गायकवाड याला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला व चक्कर आल्यासारखे वाटू लागले. सचिन गायकवाड याचा साथीदार
मनोहर रमेश माने याने पोलिसांना सांगितले त्यामुळे त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेण्यात आले.

तेथे आयसीयूमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. मेंदूत रक्तत्राव झाल्याने त्याला हा त्रास होत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याच्यावर १२ वाजताच्या दरम्यान शस्त्रक्रिया करण्यात आली, पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना शनिवारी सायंकाळी ६ वाजता,
सचिन अशोक गायकवाड त्याचा मृत्यु झाला.
आरोपीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाल्याने त्याचा तपास सीआयडी करणार आहे.

Post a Comment

0 Comments