पुणे - सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी घरफोडीतील सराईत गुन्हेगारांना अटक, आरोपींकडून, १९ लाख, २० हजार, मुद्देमाल हस्तगत.


दि.२८/०४/२०२४ रोजी संतोष हॉल जवळ आनंदनगर, सिंहगड रोड पुणे. येथील घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उप-आयुक्त, परि मंडळ-०३ पुणे शहर याचे मार्गदर्शनाखाली सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे कडील तपास पथकातील अधिकारी सपोनि सचिन निकम व पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर असे तपास पथकाची दोन पथके तयार करुन गुन्ह्याचा तपास करीत होते.

तपास पथकातील अधिकारी व अंमलदार अज्ञात आरोपी याचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, संतोष हॉल जवळ आनंदनगर, सिंहगड रोड पुणे. येथे घरफोडी चोरी करणारे इसम तुकाईनगर सर्कल वडगाव पुणे येथे थांबले आहेत, अशी बातमी मिळाली.

सदर माहिती वरिष्ठांना कळवून त्यांनी
सदर बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तपासपथकातील स्टाफ तुकाईनगर सर्कल वडगाव पुणे येथुन खाजगी वाहनाने बातमीतील ठिकाणाजवळ येवुन थांबुन बातमीतील इसम आहेत का याबाबत खात्री केली असता बातमी प्रमाणे दोन इसम थांबलेले दिसले. त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव व पत्ता १) संकेत प्रकाश निवंगुणे वय- २३ वर्षे रा. बानगुडे चाळ संघर्ष चौक, यशोदिप सोसायटी वारजे माळवाडी पुणे. २) सुरज शिवाजी भरडे वय- २४ वर्षे रा. शिवसाईनगर ग.नं. २४ पाण्याचे टाकीजवळ, सुतारदरा कोथरुड पुणे. असे सांगितले. त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी संतोष हॉल जवळ आनंदनगर, सिंहगड रोड पुणे येथे घरफोडी केल्याचे सांगितले.

सदर आरोपी यांना दाखल गुन्ह्यांत अटक करुन त्यांच्याकडे गुन्ह्यांचा अधिक तपास करता त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील मिळालेले सोन्याचे दागिने हे त्याचा साथीदार याचे कडे विक्री करण्यासाठी दिले असल्या बाबत सांगितले होते. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता त्यांनी गुन्ह्यातील गेले मुद्देमाला पैकी खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

१) १९,२०,०००/- रुपये किंमतीचे चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी ३७ तोळे वजनाचे सोने, हिरे, पाचु

२) ३०,०००/- रुपये किंमतीची चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली चोरीची दुचाकी मोटार सायकल.

१९,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अटक आरोपी यांच्याकडुन जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे शहर, श्री. संभाजी कदम सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त कार्यभार-सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री भिमराव टिळे, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर जीशेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली.

Post a Comment

0 Comments