नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदिर परिसरातील पडक्या उंच इमारतीवरून रिल्स बनवण्यासाठी केलेला व्हिडिओ, या संदर्भात गुन्हा दाखल.

भारती विद्यापीठ पोलिसांनी व्हिडिओची तपशील करूण तरुण व तरुणीवर गुन्हा दाखल केलेला आहे. स्वतःचा जीव व दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून रिल्स बनवणाऱ्या तरुण तरुणीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३०८, ३३६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुण आणि तरुणी स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून रिल्स बनवतात असे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे, यातूनच बऱ्याच वेळा जीव जाण्या सारख्या दुर्घटना देखील होतात, रिल्स बनवण्याच्या नादामध्ये एक्सीडेंट किंवा खूप मोठ्या दुखापती झालेल्या व्हिडिओ सोशल मीडियावर देखील दिसून येतात, यातूनच आत्ताच्या मुला मुलींना तरुण पिढीला स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून रिल्स बनवताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पुणे पोलिसांनी स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून रिल्स बनवणाऱ्यांवर कडक कारवाई, करण्याचा इशारा दिला आहे,


भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर.

दि.२०/०६/२०२४ रोजी नवीन कात्रज हायवे वरील स्वामी नारायण मंदीर येथील पडक्या उंच इमारतीवरुन एक तरुणी व एक तरुण यांनी त्यांचा जिव धोक्यात टाकुन एक धोकादायक व्हीडीओ तयार करुन त्याची रिल्स बनविली होती. ती रिल्स सोशल मिडीआवर व्हायरल झाली होती. त्यावेळी भारती विद्यापीठ पोलीसांनी व्हीडीओची खात्री करुन एक अनोळखी तरुण मुलगा व एक अनोळखी तरुण मुलगी यांचेवर स्वतःचे व इतरांचे जिवीत व व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केली आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ५१५/२०२४, भादंवि कलम ३०८,३३६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दाखल गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करुन त्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. शरद झिने, व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. तसेच अशा प्रकारे कोणीतीही धोकादायक कृत्य न करणेबाबत पुणे पोलीसांकडुन जनतेस आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments