पुणे - पोलीस कस्टडीतुन पलायन झालेल्या आरोपीला ४ तासात युनिट ५ गुन्हे शाखा यांच्याकडून अटक.

वाहन चोरीच्या गुन्ह्यामध्ये हडपसर पोलीस स्टेशन येथे अटक असलेला रेकॉर्डवरील आरोपी गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे हा पोलीसांची नजर चुकवुन पळुन गेल्याने एकच खळबळ उडाली होती या संदर्भात, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता, गुन्हे शाखा, युनिट-५ कडील पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम तयार करुन आरोपीला अटक करण्या संदर्भात मार्गदर्शन केले, पोलिसांना माहिती मिळाली की , रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे गोविंद उर्फ पिंट्या घोडखे हा वडकी येथील सकाळ प्रेसच्या पाठीमागे जंगलामध्ये लपुन बसलेला आहे, आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले असता आरोपी पोलिसांना बघून पळू लागला, आरोपीचा पाठलाग करून, युनिट ५ गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
दि.२१/६/२०२४ रोजी हडपसर पोलीस स्टेशन, गु.र.नं. १००४/२०२४ भा.द.वि.  कलम ३७९ मधील आरोपी नामे १) संदिप बाबुलाल यादव वय ३० वर्षे रा. जिल्हा परिषद शाळेसमोर, हांडेवाडी चौक, होळकरवाडी, पुणे २) गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे वय २४ वर्षे रा. गल्ली नंबर ५, वरदविनायक कॉलणी, गंगानगर, हडपसर पुणे यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी हडपसर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिले होते.

दि. २२/०६/२०२४ रोजी सुमारे दिड वाजे दरम्यान वर नमुद वाहन चोरीच्या गुन्हयातील आरोपीतांची फिंगरप्रिन्ट काढणेकामी त्यांना हडपसर पोलीसांनी लॉकअपमधुन बाहेर काढले असता पोलीसांची नजर चुकवुन आरोपी नामे गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे पळुन गेल्याने त्याचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०१५/२०२४, भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयातील नमुद आरोपीचा शोध घेणेकामी हद्दीत नाकाबंदी व पेट्रोलिंग करणेकामी मा. वरिष्ठांनी आदेशित केले.

त्याप्रमाणे लागलीच गुन्हे शाखा, युनिट-५ कडील पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांच्या दोन टिम तयार करुन एक टिम पुणे कॅम्पात व एक टिम पुर्वेला आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. नमुद आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे गोविंद उर्फ पिंट्या घोडखे हा वडकी येथील सकाळ प्रेसच्या पाठीमागे जंगलामध्ये लपुन बसलेला आहे. अशी बातमी मिळाल्याने आम्ही सदरची बातमी युनिट प्रभारी यांना कळवुन आम्ही लागलीच सकाळ प्रेस, वडकी येथील जंगलात जाऊन आरोपीचा शोध घेतला असता पोलीस स्टाफ ओळखत असलेला आरोपी नामे गोविंद उर्फ पिंट्या घोडखे हा एका झाडा खाली लपुन बसलेला दिसला. पोलीसांना पाहुन पळून जाऊ लागल्याने आरोपी नामे गोविंद उर्फ पिंट्या हनुमंत घोडखे वय २४ वर्षे रा. गल्ली नंबर ५. वरदविनायक कॉलणी, गंगानगर, हडपसर पुणे यास लागलीच स्टफचे मदतीने ताब्यात घेतले. त्याचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०१५/२०२४, भा.दं.वि. कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्यास पुढील कारवाईकामी हडपसर पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिला आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments