राजीव गांधी प्राणीसंग्रहालय येथून पळालेल्या बिबट्याला ४८ तासानंतर पकडण्यात कात्रज प्राणी संग्रहालय प्रशासनाला यश आले आहे, हा बिबट्या आठ साडेआठ वर्षाचा असून याचा शोध घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते, प्रशासनाकडून बिबट्याला जेरबन करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या २०० पेक्षा अधिक कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते, बऱ्याच ठिकाणी पिंजरा सुद्धा लावण्यात आला होता,
प्राणी संग्रहालयाचा पूर्ण एरिया हा १३० एकर चा असून त्यातून बिबट्याला शोधण्यात आले आहे,मंगळवारी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी या बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे, प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते अखेर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
0 Comments