सर्व वाहन चालकांना पुणे शहर पोलीस दलाकडून अहवान करण्यात येते, वाहतूकीचे नियम पाळून सर्व सामन्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेवून पोलीस प्रशासनास योग्य सहकार्य करावे,
मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात वाढत असलेल्या लोकसंख्या व त्याबरोबर वाढत असलेले वाहनांचे प्रमाण व त्यातुनच निर्माण होणारी वाहतूक समस्या व नागरिकांमध्ये घडणाऱ्या घटना, वाद-विवाद अशा समस्याने त्रस्त नागरिकांनी मुंढवा पोलीस ठाणे येथे समक्ष येवून चौकातील, विना परवाना धारक रिक्षा चालक, अस्थाव्यस्त वाहन चालविणारे चालक, नियमांचे उल्लंघन करुन नागरिकांना त्रास देत असले बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मुंढवा पोलीस ठाणे यांनी सदर घटनेचे गांभीर्य व नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे निरासन होणे गरजेचे असल्याने पोलीस ठाणे व वाहतूक शाखा असे मिळून नियंमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहिम करण्याची मोहीम राबविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे मुंढवा-केशवनगर भागातील, मुंढवा चौक परिसरातील 6 Seater रिक्षा चालकांनवर दिनांक ०४/०३/२०२४ रोजी कायदेशिर कारवाई करण्यात आली. सदर कारवाई दरम्यान नो-पाकींग, नो- इनिफॉर्म, विना-परवाना इ. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करुन २१,२००/- (एकवीस हजार दोनशे रुपये) ऐवढा दंड वसूल करण्यात आला आहे.
सर्व रिक्षा चालक यांना मुंढवा पोलीस ठाणे येथे एकत्रीत बोलून त्यांना वाहतूक नियमांचे धडे देवून उल्लंघन न करण्याच्या सक्त सुचना दिल्या, तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, वाहने पाकींग झोन मध्ये पार्क करणे, क्षमतेपेक्षा जास्त सिट वाहनामध्ये बसवून धोकादायक वाहन न चालविणे इ. बाबत मार्गदर्शन केले आहे.
सर्व वाहन चालकांना पुणे शहर पोलीस दलाकडून अहवान करण्यात येते, वाहतूकीचे नियम पाळून सर्व सामन्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेवून पोलीस प्रशासनास योग्य सहाकार्य करावे,
सदरची कामगिरी, मा. पोलीस आयुक्त, अमितेश कुमार, पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त, प्रविण पवार, पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त, मनोज पाटील पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, मा. पोलीस उप-आयुक्त, आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलीस निरीक्षक, संजय माळी, पोलीस उपनिरीक्षक, शुभांगी मगदुम, पोलीस अंमलदार संपत गांजुरे, तानाजी देशमुख, निलेश पालवे, अन्वी साकोरे, मंदाकीनी बारवकर, वाहतुक अंमलदार थोपटे, पठाण, सगर, हेंगले यांनी केली आहे.
0 Comments