विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या एका मॉलमधील पर्समधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार विमानतळ पोलिसांकडे करण्यात आले होते, सदर गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिसांनी संजय पार्क येथे एअर पोर्ट रोडच्या शेजारील मोकळ्या जागे मधुन आरोपीला ताब्यात घेतले. तपासा दरम्यान नमुद आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले असुन, त्याचेकडुन सोन्याचे दागिणे हस्तगत केलेले आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय चंदन विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
दि.०१/०१/२०२४ रोजी फिनिक्स मॉल येथील मिस्टर डी. आय. वाय. या शॉप विमाननगर पुणे येथे फिर्यादी हे खरेदी साठी गेल्यावर त्यांचे सासुची सोन्याचे दागिणे असलेली पर्स ही शॉप मध्ये पर्स ठेवण्यासाठी असलेल्या जागे मध्ये ठेवली होती. तेव्हा कोणी तरी अज्ञात चोरट्याने मॉल मधील शॉप मध्ये प्रवेश करुन फिर्यादी यांचे पर्स मधील ०३,५५,०००/- रु. किं.चे सोन्याचे दागिणे चोरुन नेले बाबत विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशा प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव खोबरे यांनी तात्काळ घटना स्थळाला भेट देवुन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना तपासा बाबत सुचना दिलेल्या होत्या.
आरोपीचा शोध घेत असताना अविनाश शेवाळे व नाना कर्चे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मिस्टर डी. आय. वाय. या शॉप विमाननगर पुणे या शॉपमध्ये चोरी करणारा इसमाचे नाव दिपक पपाले असुन तो येरवडा परीसरात राहत असुन तो सराईत चोर आहे. त्याप्रमाणे नमुद इसम नामे दिपक देविदास पपाले वय ३५ वर्ष रा. लक्ष्मीनगर येरवडा पुणे याची माहिती घेवुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी श्री. विजय चंदन व तपास पथकातील स्टाफ यांनी संजय पार्क येथे एअर पोर्ट रोडच्या शेजारील मोकळ्या जागे मधुन त्यास ताब्यात घेतले. तपासा दरम्यान नमुद आरोपी याने गुन्हा केल्याचे कबुल केले असुन, त्याचेकडुन सोन्याचे दागिणे हस्तगत केलेले आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय चंदन विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री. मनोज पाटील मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ ०३ श्री. संभाजी कदम पुणे मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे, श्री. संजय पाटील, विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आनंदराव खोबरे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक, विजय चंदन पोलीस उप निरीक्षक अविनाश शेवाळे, पोलीस अंमलदार राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रुपेश पिसाळ, नाना कर्चे, अंकुश जोगदंडे, गिरीश नाणेकर, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, गणेश इथापे, ज्ञानदेव आवारी यांनी केलेली आहे.
0 Comments