पुणे क्राईम बीट ताज्या बातम्या !

पुणे क्राईम बीट
पुणे क्राईम बीट ताज्या बातम्या

*पुणे शहरातील सर्वात प्रथम वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष युवा नेते सर्वजीत बनसोडे यांच्या हस्ते संपन्न* *काल दिनांक 12 जुलै 2023 रोजी पुणे शहरातील प्रथम ध्वजस्तंभाचे व प्रभाग क्रमांक 21 शाखा फलकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे व महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वजित दादा बनसोड यांच्या हस्ते संपन्न झाला* यावेळी शाखेचे महत्त्व पटवून देऊन तसेच शाखाध्यक्षांशी स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर संवाद साधणार असून जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीच्या शाखा किती महत्त्वाच्या आहेत हे पटवून देऊन महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच वसंतदादा साळवे यांनी व पुणे शहराच्या वतीने पुणे शहराचे महासचिव एडवोकेट अरविंद तायडे यांनी प्रभाग शाखेला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास पुणे शहर महासचिव सुनील धेंडे सर, पुणे शहर उपाध्यक्ष दीपक भाऊ शिकोत्रे, विनोद जाधव, विकास भेगडे पाटील ,पुणे शहर संघटक रफिक भाई शेख , राजाभाऊ ढाले , सहसंघटक बाबासाहेब वाघमारे , प्रसिद्धीप्रमुख संदीप चौधरी गौरव जाधव , पुणे शहर ट्रान्सपोर्ट कामगार युनियनचे सचिव रितेश भाऊ गायकवाड, हडपसरचे नेते जीवन तात्याभडके,युवा नेते मिलिंद दादा सरवदे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेचे संघटक अमित भाऊ जगताप, प्रभाग २२ चे उपाध्यक्ष सचिन भडकवार,प्रभाग 20 शाखा अध्यक्ष विनोद जकाते, प्रभागाचे 21चे मार्गदर्शक दादासाहेब गायकवाड , प्रभाग 21 चे अध्यक्ष अजितभाऊ वाघमारे,महासचिव सूरज शेलार,उपाध्यक्ष संदेश कांबळे,सिद्धार्थ माळशिखरे,संघटक अनिल नवगिरे,प्रसिद्धीप्रमुख विकास कांबळे, राहुल इजगज, व प्रभागाचे कार्यकर्ते आयन मदारी, इब्राहिम मदारी, जुनेद मदारी, संविधान एकता समितीकडून आमचे मार्गदर्शक चळवळीचे नेते संतोषभाऊ सापळे यांनी सुद्धा प्रभाग शाखेला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले व त्यांच्या सोबत विजयभाऊ जगताप आणि त्यांचे सहकारी , सुनील जावळे, उमेश भाऊ मोरे , सुहास माळी , प्रफुल्ल वाघमारे , रंजीत जगताप मुकुंद माने , गणेश चव्हाण अतुल बनसोडे , विठ्ठल साबळे प्रशांत शेलार,सलमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. *कार्यक्रमाच्या शेवटी प्रभाग अध्यक्ष अजित भाऊ वाघमारे यांनी प्रभागात कार्यकारणी सोबत अजून जोमाने काम करून वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा मानस असल्याचे मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमास आलेल्यांचे आभार मानले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल वाघमारे पुणे शहर सचिव यांच्यामार्फत करण्यात आले*. *स्वप्निल वाघमारे* सचिव. पुणे शहर *वंचित बहुजन आघाडी*
अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर एकाच वेळी दोन ठिकाणी छापा टाकुन ११, २२,५००/- रुपये किं. चा गांजा व अफिम असा अंमली पदार्थ जप्त करुन, ३ आरोपींना केले जेरबंद मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी या कामास प्राधान्य देवुन पुणे शहरा मध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व स्टाफ असे दिनांक ११/०७/२०२३ रोजी पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत महिती मिळाली की एक महिला व एक इसम हे पुणे हडपसर गाडीतळ, सिध्देश्वर पेट्रोलपंपा समोरील सार्वजनिक रोड लगत गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करीत आहे अशी बातमी मिळाली. सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील स्टफ असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता एक महिला, वय ४५ वर्षे, रा. मु.पो. खडकत, ता. आष्टी जि.बीड हिचे ताब्यात किं. रु.२.६६,६००/- कि.चा १३ किलो ३३० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व इसम नामे लक्ष्मण गवनेर काळे, वय ५५ वर्षे, रा. मु.पो. पारधी वस्ती, हिसरे ता. करमाळा, जि. सोलापुर याचे ताब्यात किं.रु. २,५६,४००/- चा १२ किलो ८२० ग्रॅम गांजा असा एकुण ५,२३,०००/- रू कि.चा २६ किलो १५० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ १०,०००/- रु किंमतीचा मोबाईल, ३,५००/- रु रोख रक्कम, ५००/- रु किं.ची कापडी पिशवी ५००/- रु किं.ची बॅग असा एकुण ५,३७,५००/- रु कि.चा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्यांचेविरुध्द व त्यांना गांजा विक्री करीता देणा-या इसमांविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन गुरनं. १०११/२०२३. एन. डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २०(ब) (ii) (क) २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच दुसरीकडे अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक - ०१ कडील स्टाफ असे दि. ११/०७/२०२३ रोजी पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, सचिन माळवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा मार्केट यार्ड येथील मार्केट यार्ड लेन नंबर ३ गणेश मंदिरा समोर जे.के ट्रेडींग कंपनीचे बाजुला सार्वजनिक रोडवर अफिम या अंमली पदार्थाची विक्री करीता येणार असल्याची माहिती मिळताची सदर ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील स्टाफ यांनी जावुन छापा टाकला असता इसम नामे तुलछाराम गीगाराम चौधरी, वय - ३९ वर्षे रा. सध्या तुळजाभवानी नगर, आई माता मंदिरजवळ, बिबवेवाडी पुणे मुळ रा. मुख्याग्राम मोडी, सतलान जोधपुर सतलान, राज्य राजस्थान हा त्याचे ताब्यात ५,८५,०००/- रु कि.चा ऐवज त्यामध्ये २५० ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ ५००,०००/- रु किचा, तसेच १५,०००/- रु किंचे दोन मोबाईल फोन ५०,०००/- रु किंची एक सुझुकी अॅक्सेस गाडी, रोख रुपये असा अंमली पदार्थ ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिर रित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला. सदर बाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. १७१ / २०२३. एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क). १७ ( ब ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे - १, पुणे, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, पांडुरंग पवार, सचिन माळवे, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे..

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

परराज्यामध्ये डान्स कार्यक्रम करण्याकरता गेलेल्या तरुणीच्या घरामध्ये घरफोडी करणा-या चोरट्याकडुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम व महागडा मोबाईल हस्तगत...

दिनांक २६/०६/२०२३ रोजी ते दिनांक ०९/०७/२०२३ रोजीचे पहाटे ०५.३० वा. दरम्यान फिर्यादी हे लग्नामध्ये डान्सचे कार्यक्रमाकरता गुजरात येथे गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे मुख्य दरवाज्याचे लॉक कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटाचे लॉकर तोडुन त्यामधुन ५,६०,०००/- रुपये किंमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चेन, तसेच ७,५०,०००/- रुपये रोख असा एकुण १३,१०,०००/- रुपये किंमतीचा माल लबाडीच्या इरादवाने चोरी केला आहे म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४५४ / २०२३ भादवि कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा इसम नाम शुभम अशोक माने, वय २३ वर्षे, धंदा नोकरी, रा. सध्या, मांगडेवाडी, कात्रज, पुणे मुळ रा., धनकवडी  पुणे याने केला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपीताचा शोध घेवून त्यास दिनांक ०९/०७/२०२३ रोजी अटक केली आहे. आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास करता त्याचेकडुन गुन्हयातील फियांदी यांचे चोरी केलेले ५,६०,०००/- रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे सोन्याच्या अंगठया, चेन, ५,३७,००००/- रुपये रोख रक्कम व एक १,२५,०००/- रुपयांचा सॅमसंग कंपनीचा एस. २३ अल्ट्रा, लोखंडी रॉड, चावी असा एकुण १२,२२,०००/- (बारा लाख बावीस हजार) रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


सदरची कारवाई मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा नारायण शिरगावकर सगो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार तसेच पोलीस निरीक्षक + (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार राहुल तांबे, विक्रम सावंत, सचिन सरपाले, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली आहे.


पोलीस स्टेशन वाकड


वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.
घातक शस्त्रांचा तसेच आत्याधुनिक साधनांचा वापर करुन बॅक फोडणारे दरोडेखोर टोळीस अटक
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशनचे मार्शल यांना डायल ११२ वर त्वरीत प्रतिसाद देणेबाबत मा.श्री.विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेशीत केले असुन त्या अनुषंगाने जनमाणसातील पोलीसांची प्रतिमा व त्यांचे विषयी विश्वासअहंता निर्माण होईल याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले आहेत. जेणेकरुन पोलीस काम करीत असताना त्यांचे बद्दल आदर निर्माण होईल.


दि.०९/०७/२०२३ रोजी रात्रौ ०१.२८ वा एमडीटीवर, डांगे चौकाजवळील गणपती मंदीर शेजारी असलेले फेड बँक येथे चोरी होत असून पोलीस मदत पाहीजे अशा प्रकारचा कॉल प्राप्त झालेने. तात्काळ वाकड मार्शल व थेरगाव मार्शल असे दोन्ही मार्शल ०५ मिनीटाचे आत घटनास्थळी जावुन कॉलर यास फोन करुन माहीती घेतली असता त्याने सांगीतलेले दोन बंद गाळयातील एका गाळयाचे शटर अर्धवट उघडे दिसले त्यामुळे मार्शलला असलेले पोलीस अंमलदार यांनी शटरजवळ पाहणी केली असता फेडरल बँकेचे एका भिंतीस मोठे होल पडलेले दिसले. त्यामुळे मार्शलने अंधारात पाहणी केली असता अचानक ०८ अनोळखी दरोडेखोर शस्त्रांसह पोलीस अंमलदारावर चालून आले त्यांना पोलीस अंमलदारांनी जोरदार प्रतिकार करुन ०४ दरोडेखोरांना ताब्यात घेतले. उर्वरीत ०४ दरोडेखोर पळुन जात असताना त्याचे पाठलाग करणारे पोशि सोणवणे हे पडुन जखमी झाले आहेत.


सदरचे पकडलेले ०४ दरोडेखोरांकडे कसून तपास केला असता त्यांनी आपण फेड बँक फोडण्यासाठी सर्व साहीत्य व शस्त्रांसह आलो होतो व बँक फोडणेचे प्रयत्नामध्ये असताना पोलीसांची आम्हाला चाहुल लागलेने आम्ही अंधाराचा फायदा घेवुन दडुन बसलो परंतु पोलीस आम्हाला शोधत आहे असे पाहुन त्यांचेवर शस्त्रांसह प्रतिकार करुन तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न केला असे सांगीतलेने लागलीच तात्काळ वाकड मार्शलला नेमलेले पोशि.

कांबळे यांची फिर्याद घेवुन ०४ आरोपींना अटक केली असुन (डॉ. काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड(डॉ. काकासाहेब डोळे) पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड उर्वरीत ०४ आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींकडुन मोठया प्रमाणावर बँक फोडणेसाठी लागणारे गॅस कटर, गॅस सिलेंडर, स्कु ड्रायव्हर, लोखंडी अवजारे, भिंत फोडणेसाठीचे गिरमीट असे साहीत्य जप्त करणेत आले असून अधिक तपास करीत आहोत. गुन्हयातील पळुन गेलेले ०४ दरोडेखोरांचा शोध घेणेकरीता गुन्हे शोध पथकाचे दोन टिम तयार केले असुन त्यांना योग्यत्या सुचना देवून रवाना केले आहेत. तसेच सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आपले हद्दीत नाकाबंदी करुन संशयीतांचा कसून शोध करणेबाबत आदेश दिले आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त सो, मा. श्री. डॉ. काकासाहेब डोळे सो पोलीस उप आयुक्त परि २, मा. श्री. डॉ. विशाल हिरे सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मा. श्री. रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि संतोष पाटील, सपोनि. अनिल लोहार, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफोविभीषण कन्हेरकर, सपोफौ. बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहवा. बंदु गिरे, पोहवा. संदीप गवारी, पोहवा. दिपक साबळे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा, प्रमोद कदम, पोना. प्रशांत गिलबीले, पोशि. अजय फल्ले, पोशि. तात्या शिंदे, पोशि कौर्तेय खराडे, पोशि. भास्कर भारती, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि रमेश खेडकर, पोशि, विनोद सोणवणे, पोशि नागनाथ कांबळे, पोशि खोडदे, घाडगे यांनी मिळून केली आहे.



खडक पोलीस स्टेशन यांच्यावतीने, संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त, यांच्या अध्यक्षतेखाली, समुपदेशनकार्यशाळा आयोजित.



पुणे : सुप्रसिद्ध शाळेतील मुलींच्या टॉयलेटमध्ये CCTV कॅमेरे, पुण्यातील घटना; हिंदुत्त्वादी

संघटनेकडून प्रिन्सिपलला मारहाण, व्हिडिओ व्हायरल:


पुण्यातील एका महाविद्यालयात लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तळेगावमधील डॉ. डी. वाय. पाटील
महाविद्यालयात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पुण्यातून एक धक्कादायक आणि लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. तळेगावमधील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयातील
(Dr. D. Y. Patil College) लेडीज टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही आहेत आणि तिथं ख्रिश्चन समाजाची प्रार्थना का घेतली जाते? असे
दोन आरोप करून महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मारहाण करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले
आहेत. हा प्रकार लवकर थांबवा आणि प्राचार्यांची बदली करा, अशी मागणी सध्या केली जात आहे. सादर घटना दोन दिवसांपूर्वी
घडली आहे





पीसीबी, गुन्हे शाखा, पुणे शहर अंतर्गत एमपीडीए कारवाई:


दिनांक 08/07/2023 रोजी दुपारी 12:30 चे दरम्यान कै. आनंदराव बागवे सांस्कृतिक भवन समाज मंदिर काशेवाडी  येथे खडक पोलीस स्टेशन यांच्यावतीने माननीय श्री संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली काशेवाडी येथील अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता व गुन्हेगारी याबाबत समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी 1)शितल अस्तित्व - डॉ. गायत्री कोटबागी 2) मनोदय दे एडिक्शन सेंटर-  डॉ. विष्णू श्रीमंगले, मैत्री पांडे  3) तेरे देव होम्स - मंदार शिंदे यांचे उपस्थितीत काशेवाडी भवानी पेठ परिसरातील अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात आहेत अशा मुलांचे परिवर्तन करण्याकरिता मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती.    सदर कार्यशाळेसाठी,  श्री अशोक धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त फरसखाना विभाग, श्री.विनय पाटणकर पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन तसेच  माजी नगरसेवक अविनाश बागवे, संदीप लडकत, भारत कांबळे, अर्चना पाटील  यांचे सह खडक पोलीस स्टेशन कडील शांतता समिती, मोहल्ला समिती, अल्पसंख्याक समिती, महिला दक्षता समिती सदस्य,  प्रतिष्ठित नागरिक व अल्पवयीन मुलांचे पालक  हजर होते.जनसमुदाय  100 ते 120 जन उपस्थित होते.

      

 सुनील माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक

   खडक पोलीस स्टेशन पुणे शहर


पोलीसांनी दोन जणांना केली अटक

पुण्यातील सहकारनगर परिसरात कोयता गँगने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच कोयता गँगने पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे. टोळक्याने भर रस्त्यात गाडीच्या बोनेटवर बसून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी पोलीसांनी दोन जणांना अटक केली आहे.

सध्या टोळक्यांचा वाढदिवसाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका टोळक्याने भर चौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. हा केक कापत असताना टोळक्यांनी या ठिकाणी धिंगाणा घातला. तसेच आरडाओरडा करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते.


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दोन जणांना अटक केली आहे. टोळक्यांचा सातत्याने धुडगुस सुरू असल्याने पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला की नाही? पोलीस टोळक्यांना कधी व्यसन घालणार? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समर्थकास आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल..! 

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे कट्टर समर्थक सुरेश कांबळे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरर्णी गुन्हा दाखल

करण्यात आला आहे. भूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक अपहरण प्रकरणातील मुख्य आरोपी व पालकमंत्री

तानाजी सावंत यांचे समर्थक सुरेश कांबळे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात

आला आहे.


गर्भलिंग निदान प्रकरणात गाजलेले बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर पाठवून भूम येथील ३० वर्षाच्या तरुणाने बुधवारी पहाटे आत्महत्या केली. फैय्याज दाऊद पठाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती बार्शी येथील डॉ. नंदकुमार स्वामी यांच्या खासगी वाहनावर चालक होता. या डॉक्टरच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागला. त्यानंतर फैय्याजने पानटपरी सुरू केली. पुन्हा कामावर ये अन्यथा स्वामी यांचे पैसे परत कर, अशी धमकी सुरेश कांबळे व त्याचे साथीदार देत होते. त्यातून ही आत्महत्या झाल्याचे सांगण्यात येते.सुरेश कांबळे हे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर तातडीने पोलीस कारवाई व्हावी अशी फैय्याज पठाण यांच्या नातेवाईकांची मागणी आहे.







Post a Comment

0 Comments