Pune Crime News


अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा,

पुणे शहर एकाच वेळी दोन ठिकाणी छापा टाकुन ११, २२,५००/- रुपये किं. चा गांजा व अफिम असा अंमली पदार्थ जप्त करुन, ३ आरोपींना केले जेरबंद मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी या कामास प्राधान्य देवुन पुणे शहरा मध्ये अंमली पदार्थाची तस्करी करणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व स्टाफ असे दिनांक ११/०७/२०२३ रोजी पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत महिती मिळाली की एक महिला व एक इसम हे पुणे हडपसर गाडीतळ, सिध्देश्वर पेट्रोलपंपा समोरील सार्वजनिक रोड लगत गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करीत आहे अशी बातमी मिळाली. 

सदर बातमीचे अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील स्टफ असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता एक महिला, वय ४५ वर्षे, रा. मु.पो. खडकत, ता. आष्टी जि.बीड हिचे ताब्यात किं. रु.२.६६,६००/- कि.चा १३ किलो ३३० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ व इसम नामे लक्ष्मण गवनेर काळे, वय ५५ वर्षे, रा. मु.पो. पारधी वस्ती, हिसरे ता. करमाळा, जि. सोलापुर याचे ताब्यात किं.रु. २,५६,४००/- चा १२ किलो ८२० ग्रॅम गांजा असा एकुण ५,२३,०००/- रू कि.चा २६ किलो १५० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ १०,०००/- रु किंमतीचा मोबाईल, ३,५००/- रु रोख रक्कम, ५००/- रु किं.ची कापडी पिशवी ५००/- रु किं.ची बॅग असा एकुण ५,३७,५००/- रु कि.चा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्यांचेविरुध्द व त्यांना गांजा विक्री करीता देणा-या इसमांविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन गुरनं. १०११/२०२३. एन. डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क) २०(ब) (ii) (क) २९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच दुसरीकडे अंमली पदार्थ विरोधी पथक ०१ कडील सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक - ०१ कडील स्टाफ असे दि. ११/०७/२०२३ रोजी पुणे शहरातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, पांडुरंग पवार, सचिन माळवे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा मार्केट यार्ड येथील मार्केट यार्ड लेन नंबर ३ गणेश मंदिरा समोर जे.के ट्रेडींग कंपनीचे बाजुला सार्वजनिक रोडवर अफिम या अंमली पदार्थाची विक्री करीता येणार असल्याची माहिती मिळताची सदर ठिकाणी सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील स्टाफ यांनी जावुन छापा टाकला असता इसम नामे तुलछाराम गीगाराम चौधरी, वय - ३९ वर्षे रा. सध्या तुळजाभवानी नगर, आई माता मंदिरजवळ, बिबवेवाडी पुणे मुळ रा. मुख्याग्राम मोडी, सतलान जोधपुर सतलान, राज्य राजस्थान हा त्याचे ताब्यात ५,८५,०००/- रु कि.चा ऐवज त्यामध्ये २५० ग्रॅम आफिम हा अंमली पदार्थ ५००,०००/- रु किचा, तसेच १५,०००/- रु किंचे दोन मोबाईल फोन ५०,०००/- रु किंची एक सुझुकी अॅक्सेस गाडी, रोख रुपये असा अंमली पदार्थ ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिर रित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला.

सदर बाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशन गु.र.नं. १७१ / २०२३. एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८(क). १७ ( ब ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे - १, पुणे, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक, लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, पांडुरंग पवार, सचिन माळवे, मनोजकुमार साळुंके, विशाल शिंदे प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, राहुल जोशी, मारुती पारधी, सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे..

Post a Comment

0 Comments