स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर. खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांकडून अटक.

पुणे ग्रामीण राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खुनाचा प्रयत्न  करून पसार झालेल्या आरोपीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे, आरोपी हा गुलटेकडी येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

राजगड पोलीस ठाणे पुणे ग्रामीण गुन्हा रजि. नं.२२४/२०२४ भा.द.वि. कलम ३०७,३५३, मधील फिर्यादी यांनी आरोपी नामे रोहन साळवे रा. कल्याण ता. हवेली जि.पुणे यांचे विरुद्ध तक्रार दिल्याने वर नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.

आज रोजी सदर गुन्हयातील आरोपी हा स्वारगेट येथील गुलटेकडी परिसरामध्ये आला असल्याबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे अंमलदार अनिस शेख व रमेश चव्हाण यांना मिळाल्याने त्यांनी सदर बातमी बाबत तपास पथकाचे सपोनि प्रशांत संदे यांना सांगितली असता त्यांनी सदर बातमी बाबत मा. दिलीप फुलपगारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

त्यावरुन सपोनि प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले व पोलिस अमंलदार अनिस शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे असे मिळुन मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता सदर आरोपी दिसुन आल्याने त्याचा शिताफीने पाठलाग करुन ताब्यात घेवुन त्यास त्याचा नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रोहन गौतम साळवे वय २४ वर्षे रा. कल्याण ता. हवेली जि. पुणे असे असल्याचे सांगितले त्याचेकडे वरील गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील तपास कामी राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे कडील पोलीस अंमलदार यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर श्रीमती नंदिनी वग्यानी, यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती गीता बागवडे यांच्या आदेशाने तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक येवले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले व पोलीस अंमलदार अनिस शेख, रमेश चव्हाण, सोमनाथ कांबळे, शिवा गायकवाड, फिरोज शेख, दिपक खंदाड, प्रविण गोडस, संदीप घुले, सुजय पवार यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Post a Comment

0 Comments