पुणे - भारती विद्यापीठ पोलिसांकडून पिस्टल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक, त्याच्याकडून १ गावठी बनावटीचे पिस्टल व ३जिवंत राऊंड जप्त.

भारती विद्यापीठ पोलिसांकडून लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी पोलिसांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये , म्हणून पोलिसांना सूचना दिल्या, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस पेट्रोलिंग करीत असताना, पोलिसांना माहिती मिळाली की कात्रज तलाव येथे एका अल्पवयीन मुलाकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली , अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन, १ पिस्टल व ३ काडतुसे जप्त केली आहे, पुढील तपास पोलीस करत आहे.


दि.०६/०५/२०२४ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने कात्रज गावातील, तलावाजवळील महादेवाचे मंदीराजवळील शौचालयाजवळ, कात्रज, पुणे येथे एक विधीसंघर्षीत बालक, वय १७ वर्षे, हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रु. किं.चे एक गावठी बनावटीचे पिस्टल व १५००/- रु. किं.चे ३ जिवंत काडतुसे असा एकुण ५१,५००/- रु.चे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३८१/२०२४, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ- २ श्रीमती स्मार्तना पाटील मा सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे. श्रीमती नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार विक्रम सावंत, राहुल तांबे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, अभिनय चौधरी, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, निलेश जमदाडे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, हनमंत मासाळ, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments