सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर. गावठी हातभट्टी दारूचा व त्यासाठी लागणारे रसायनचा साठा उधवस्त करून तसेच विक्री करणाऱ्या आरोपींना अटक, १ कोटी, ६ लाख,९५ हजार रू.चा मुद्देमाल जप्त.


दि.२३/४/२०२४ रोजी शेत गट क्र. ४२१, वडगाव शिंदे, ता. हवेली. जि. पुणे येथे गावठी हातभट्टी दारु व त्यासाठी लागणाऱ्या रसायणाचा साठा असलेबाबत पोलीस अंमलदार भिवरकर व जमदाडे यांना गोपनिय बातमीदार मार्फतीने खात्रीशीर बातमी मिळाली.

सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, एकुण सात ठिकाणाहुन (जमिनी खालच्या टाक्या) २,१०,००० लिटर हातभट्टी दारू तयार करणेसाठी लागणारे रसायन त्याची किंमत १,०५,००,०००/-व तयार हातभट्टी दारू १५०० लिटर त्याची अंदाजे किं १,८०,०००/- व हातभट्टी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य १५०००/- रू असा एकुण कि.अं. १,०६,९५०००/- रू. (एक कोटी सहा लाख पंच्याण्णव हजार) रू. चा मुद्देमाल मिळुन आला असुन सदर बाबत  ३ आरोपी त्यांचे विरूध्द स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी मनुष्यास गुंगी येवुन जिवीतास हानी होईल अशा प्रकारे गावठी हातभट्टी दारू तयार केले म्हणुन लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुरनं ४००/२०२४ भादवि कलम ३२८, ३४, महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५ (ख) (च) (ड) अन्वये तीन व्यक्ती विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भरत जाधव तसेच सपोनि अनिकेत पोटे, सपोनि राजेश माळेगावे सहा. पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, हणमंत कांबळे, ओंकार कुंभार, इरफान पठान, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, सागर केकाण, संदीप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, अविनाश कोंडे या पथकाने यशस्वी केली आहे.

Post a Comment

0 Comments