कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या बोपदेवघाट येवलेवाडी येथे असणाऱ्या टेबल पॉइंट येथे फिरायला आलेल्या मुला मुली व तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना लुटमार करणारे टोळी असल्याच्या तक्रारी कोंढवा पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या,यासंदर्भात एका फिर्यादीने कोंढवा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती सदर व्यक्ती आणि त्यांचे मित्र तिथून जात असताना ,फिर्यादी यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडून पाच हजारांची मागणी केली, व फिर्यादी यांच्याकडून ऑनलाईन पैसे जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले आहे, कोंढवा पोलीस स्टेशन येथे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे , त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपासाकामी टीम तयार केले, येवलेवाडी टेबल पॉइंट ,बोपदेव घाट येथे सापळा रचून आरोपींना धारदार हत्यारा सह ताब्यात घेण्यात कोंढवा पोलिसांना यश आले आहे, आरोपी ताब्यात घेऊन ,ते हत्यार घेऊन येथे काय करत आहे ,असे विचारले असता त्यांनी सांगितले येथून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना व येथे फिरायला आलेल्या मुला मुलींना हत्याराचा धाक दाखवून लुटमार करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले, सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ कोयते, १ सुरा , ३ मोबाईल , २ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे, १ लाख,७२ हजार, २५० रू किं चा मुद्देमाल हस्तगत करून, ५ जबरी चोरीचे गुन्हे उघड केले आहे.
दि. २१/०४/२०२४ रोजी रात्रौ २:३० वा चे सुमारास फिर्यादी नामे आशुतोष संजयकुमार राज, वय २२ वर्षे, धंदा शिक्षण, रा. त्रिमुर्ती चौक, पुणे हे त्यांच्या मित्र नामे आयान श्रिवास्तव, अनिकेत कुमार, आनंद राज याचे सह बोपदेव घाट येथील टेबल पॉटवर, येवलेवाडी, कोंढवा बु., पुणे येथे गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकी गाडी नं एम एच २५ बीबी १४७७ व एम एच ४५ एबी ८८९३ यावरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून तसेच हाताने मारहाण करून त्यांना ५ हजार रूपयांची मागणी केली असता फिर्यादी व त्यांच्या मित्रांकडे रोख पैसे नसल्याने जबरदस्तीने ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडुन त्यांच्या दुचाकी गाड्यांवरून पळुन गेले. त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू करून नमुद गुन्ह्यातील आरोपीबाबत बातमीदारामार्फतीने माहिती काढत असताना दि.२१/०४/२०२३ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्री. बालाजी डिगोळे यांचे पथकातील पोअंग शाहिद शेख व लक्ष्मण होळकर यांना त्याच्या खास बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, दोन दिवसापूर्वी बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेलेल्या मुलांना लुबाडणे आरोपी है पुन्हा लुबाडण्याच्या उद्देशाने बोपदेव घाटात आलेले आहे.
तेव्हा सदर आरोपी यांना पकडण्यासाठी तपास पथकातील अंमलदार पौहवा, सतिश चव्हाण, मोहवा/ निलेश देसाई, पोहवा विशाल मेमाणे, पोना/ गोरखनाथ चिनके, पो.अं./शाहिद शेख, पो.अं./ लक्ष्मण होळकर, पो. अं. संतोष बनसुडे, पो. अं/ सुजित मदन, पो. अं/ सुरज शुक्ला व असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, कोंढवा पो स्टे पुणे शहर व पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे बोपदेव घाट येथे जावुन स्टाफच्या दोन टिम तयार करुन आरोपी यांचा शोध घेत असताना बोपदेव घाटात अंधारामध्ये दोन दुचाकी गाड्या टेबल पॉइंटवर आलेल्या दिसून आल्या. सदर गाड्यांवरील तीन इसमांनी त्यांच्या दुचाकी गाड्या टेबल पॉइंटवर पार्क केल्या. त्यातील मोपेड गाडीवरील चालकाने गाडीचे डिकीतून हत्यारे बाहेर काढली व ती तीघांनी आपापल्या पेंटमध्ये खोचून ठेवली, त्यानंतर ते टेबल पॉइंटवर आजु बाजुला टेहाळणी करीत फिरू लागले. सदर इसम हेच टेबल पॉइंवर जबरी चोरीचा प्रकार करीत असल्याचे लक्षात आले. पोलीस त्यांचे नजिक जात असताना त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने ते पळत जाऊ लागले. पोलीस स्टाफने त्यांना घेरून पोलीस असल्याचे सांगितल्याने त्यांनी त्यांच्याकडील हत्यारे खाली जमिनीवर ठेवली. पोलीसांनी त्यांना हत्यारे घेवून सदर ठिकाणी येणाचे कारण विचारले असता त्यांनी सदर ठिकाणी बसलेल्या मुला मुलींना लुटण्याकरीता आल्याचे सांगितले. सदर इसमांना त्यांच्याकडील हत्यारांना व दुचाकी गाड्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे १) साहील अकबर बानेवाले, वय २० वर्षे, रा. संगम हॉस्पीटल जवळ, सिटी सेंटर रोड, उंड्री, पुणे २) राहूल परवाराम गौतम, वय २१ वर्ष, रा स.नं. ५३, काळे पडळ, गल्ली नं ५. हडपसर, पुणे व ३) गालीब बादशाह मेहबुब अत्तार, वय १९ वर्षे, रा संगम हॉस्पीटल जवळ, सिटी सेंटर रोड, उंड्री, पुणे. असे असल्याचे सांगितले.
सदर आरोपीतांचे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान अद्याप पर्यंत एकुण २ दुचाकी गाड्या, दोन धारदार कोयते एक धारदार सुरा व ३ मोबाईल फोन असा एकूण १,७२,२५०/- रू किं चा मुद्देमाल हस्तगत करून पुढीलप्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहे.
१) कोंढया पोलीस ठाणे पुणे गुरन. ३६८/२०२४ भादंवि कलम ३९४.
२) कोंढवा पोलीस ठाणे पुणे ४५०/२०२४ भादंवि कलम ३९४.
३) कोंढवा पोलीस ठाणे पुणे ४५३/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२.
४) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं २२४/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२.
५) लोणी काळभोर पो.स्टे गु.र.नं २२५/२०२४ भा.दं.वि. कलम ३९२.
असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आले आहे.
वरील नमुद कारवाई ही श्री अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, श्री प्रविण पवार मा.सह पोलीस आयुक्त, श्री मनोज पाटील, मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, श्री आर राजा, मा.पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ-५, गणेश इंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री संतोष सोनवणे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री मानसिंग पाटील, मा. पोलीस निरीक्षक, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोहवा/ सतिश चव्हाण, पोहवा / विशाल मेमाणे, पोहवा निलेश देसाई, पोना/ गोरखनाथ चिनके, पो.अं/ शाहिद शेख, पो.अं./ लक्ष्मण होळकर, पो.अं. संतोष बनसुडे, पो.अं./ सुजित मदन, पो.अं. सुरज शुक्ला व यांच्या पथकाने केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे हे करीत आहेत.
0 Comments