विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या विश्रामबाग पोलिसांनी आवळल्या मुसक्या, आरोपीकडून ४ लाख, ९ हजार - रु किंमतीचा मुद्देमाल जप्त, २ घरफोडीचे गुन्हे उघड.


विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे घरफोडीचा गुन्हा दाखल होता विश्रामबाग पोलिसांनी घरफोडी झालेल्या परिसरातील सीसीटीव्ही चेक करून व बातमीदारांकडून माहिती घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपीला विश्रामबाग पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे, घरफोडीतील सराईत आरोपी याच्याकडून, एकुण २ घरफोडी गुन्हयांची उकल करुन ४ लाख, ९ हजार - रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


विश्रामबाग पोलीस स्टेशन गुरनं ७२/२०२४ भादंविक ४५७,४५४,३८० प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयाच्या अनुशंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली भुजबळ पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अरुण घोडके यांनी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बरुरे व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले असता त्यांनी घरफोडी झालेल्या घटनास्थळावर भेट देवुन सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व बातमीदारामार्फत घरफोडी गुन्ह्यातील संशयिताचा शोध घेतला असता जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड वय ३८ वर्षे रा. डी.पी. रोड, सुरज प्रोव्हिजन जवळ, गणेशखिंड, पुणे याने वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्याप्रमाणे आरोपी हा पुणे रेल्वे स्टेंशन या परिसरात असल्याचे तपास पथकातील पोउपनिरी. बरुरे, व पोलिस अमंलदार यांना बातमीदारामार्फत समजले. पथकातील पो. अमंलदार मयुर भोसले, वलटे, आशिष खरात व पाटील यांनी आरोपी जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड याचा विश्रामबाग, शिवाजीनगर तसेच पोलीस स्टेशन हद्दीमधील सीसीटीव्ही फुटेज वरुन माग काढत सतत ०४ दिवस कसोशीने शोध घेवुन व सापळा रचुन त्यास शिताफीने पुणे रेल्वे स्टेंशन परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने नमूद गुन्हयातील तसेच विश्रामबाग पोलीस ठाणे, गुरनं ८०/२०२४ भादंविक ४५७,४५४,३८० ही घरफोडी देखील त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले.

विश्रामबाग पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपुर्ण तपास करुन अतिशय शिताफीने आरोपी नामे जयवंत ऊर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड वय ३८ वर्षे रा. डी.पी. रोड, सुरज प्रोव्हिजन जवळ, गणेशखिंड, पुणे यास अटक केलेली असुन त्याच्याकडुन एकुण २ घरफोडी गुन्हयांची उकल करुन ४ लाख, ९ हजार - रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१ श्री. संदिप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती दिपाली भुजबळ पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अरुण घोडके तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, सपोफौ राकेश गुजर, पोलिस अमंलदार रेवण कंचे, अशोक माने, मयुर भोसले, गणेश काठे, महावीर वलटे, आशिष खरात, मोरे, पाटील, शेरखाने, अर्जुन थोरात बाबर, यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments