वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने येरवडा पोलीसांनी एका सराईताकडून देशी बनावटीचे २ पिस्टल व ४ राऊंड जप्त केले आहे, त्याचेवर यापूर्वी येरवडा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून मोक्याच्या गुन्हयात येरवडा कारागृहात होता. सहा महिन्यापूर्वी येरवडा कारागृहातून बाहेर आला होता. अभिषेक नारायण खोंड, वय २३ वर्षे, रा लोहगाव रोड, वाघोली पुणे असे सराईताचे नाव आहे.
सदर बाबत तपास पथकाचे पोलीस अंमलदार कैलास डुकरे व सुशांत भोसले हे दि. १७/०४/२०२४ रोजी गुन्हेगार चेक करीत असताना त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुंड अभिषेक खोंड याच्याकडे पिस्टल असून तो वडगाव शेरी भागातील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत कोणाची तरी वाट बघत थांबलेला आहे.
मिळाली बातमी तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी कळवुन तपास पथकाचे स्टाफ सह बातमीच्या ठिकाणी जाऊन येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील व पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. राहुल जगदाळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे अग्नीशस्त्र बाळगणा-यास ताब्यात घेऊन त्याच्या कडून एक पिस्टल व २ राऊंड मिळून आले. सदर बाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं २२०/२०२४ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलीस कस्टडीमध्ये तपासा दरम्यान त्याचे कडून आणखी एक पिस्टल व २ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे आरोपीकडून एकूण ६५,५००/- रु किं.चे २ पिस्टल व ४ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, अतिरिक्त कार्यभार येरवडा विभाग, श्रीमती आरती बनसोडे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुल जगदाळे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांनी केलेली आहे.
0 Comments