बिबवेवाडी पोलिस स्टेशन पुणे शहर. चोराने मारला शेजारच्याच घरात हात, शेजारी राहणारे गावाला गेले असताना त्यांच्या घरात घुसून ७ लाख,१७ हजार, रू, चे सोन्याचे व चांदीचे दागिने केले लंपास.आरोपीला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक.


बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये राहणारे फिर्यादी हे, आपल्या मूळ गावी सोलापूर येथे गेले असताना शेजारच्या राहणाऱ्या इसमाने आपल्या फायद्यासाठी शेजारच्या घरातील खिडकी तोडून घरात घुसून कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याची बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद करण्यात आली होती, या संदर्भात बिबवेवाडी पोलिसांनी  फिर्यादी यांचेकडे केलेल्या चौकशीवरून व तपास पथकातील पोलीस अमंलदार यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून तसेच तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्हयातील संशयीत इसम हा फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे, त्याच्याकडे तपास केला असता, चोरीला गेलेला मुद्देमाल आरोपी शेजाऱ्याकडून हस्तगत करण्यात आला आहे, एकूण ७ लाख, १७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने त्याच्याकडून मिळून आले आहे, सदर गुन्ह्यांमध्ये शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 


दि.२८/०९/२०२३ रोजी फिर्यादी हे आपले मुळगावी सोलापुर शहर या ठिकाणी गेल्याने त्यांचा राहता घराला कुलूप लावून गेले होते व पुन्हा दि.०२/१०/२०२३ रोजी राहते घरी आले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर राहते घराचे हॉलचे बाल्कनी चे दरवाजाचे कडी कोयंडा कशाचे तरी सहाय्याने तोडून त्यावाटे घरामध्ये प्रवेश करुन घरातील बेडरुमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा कशाचे तरी सहाय्याने उचकटून कपाटाचे ड्रॉव्हर मधील दागिणे हे घरफोडी चोरी करुन चोरून नेले म्हणून फिर्यादी यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. २०१/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ४५४,४५७,३८० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, व तपास पथकातील अमंलदार यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीचे मोडस वरून तसेच फिर्यादी यांचेकडे केलेल्या चौकशीवरून व तपास पथकातील पोलीस अमंलदार यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून तसेच तांत्रिक विश्लेषण करून दाखल गुन्हयातील संशयीत इसम दिपक नामदेव पाटोळे, वय ४१ वर्षे रा. पापळ वस्ती रोड, बिबवेवाडी, पुणे. यास अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हया बाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडून घरफोडी चोरी करून नेलेले कि. रू.७,१७,०००/-रू. चे सोन्याचे व चांदीचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अमंलदार संतोष जाधव, विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments