पुणे - समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी, सराईत वाहन चोरास अटक, आरोपीकडून ५ वाहने जप्त.

पुणे शहरातून वाहन चोरणाऱ्या एका आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे सदर आरोपी हा पुणे शहराच्या विविध ठिकाणाहून वाहन चोरी करायचा समर्थ पोलिसांनी माहितीच्या आधारे सदर आरोपीला अटक केली आहे त्याच्याकडून ५ वाहने जप्त करण्यात आली आहे.

समर्थ पोलीस स्टेशन परिसरातील हद्दीमध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करीत असताना पदमजी पार्क लेन, राजेवाडी झोपडपट्टीच्या येथे एक इसम संशयरीत्या थांबला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवून बातमीच्या ठिकाणी जाऊन सदर आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीकडून ५ वाहने मिळून आली, सदर आरोपी हा सराईत वाहन चोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली,
त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने विश्रामबाग सहकारनगर पर्वती पोलीस स्टेशन व मानोरा पोलीस स्टेशन जिल्हा वाशीम या पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच सदर आरोपीवर यापुर्वी देखील पुणे शहर परीसरात गुन्हे दाखल आहेत.


समर्थ पोलीस ठाणेकडील तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक श्री सौरभ माने, श्री सुनिल रणदिवे व तपास पथकातील पोलिस अमंलदार हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार इम्रान शेख व शरद घोरपडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पदमजी पार्क लेन, राजेवाडी झोपडपट्टीच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालया समोर एक इसम दुचाकी मोटार सायकलसह संशयितरित्या थांबलेला असले बाबत माहीती मिळाली.
सदरची खबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील यांना कळविली असता, त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कारवाई करणेस सांगितल्याने. तपास पथकातील स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता, बातमीतील इसम हा पोलीसांना पाहताच दुचाकी मोटार सायकल तेथेच सोडुन पळुन जावु लागला त्यास लागलीच स्टाफच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यास त्याचा नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव ललीत सुनिल भोई/परदेशी, वय-२९ वर्षे, धंदा-नाही रा. विश्वनाथ अर्पाटमेन्ट, पाचवा माळा, ८६ पर्वती गावं, पुणे असे असल्याचे सांगितले. याच्या ताब्यात समर्थ पो स्टे गुरक्र ७८/२०२४, भादवि कलम ३७९ मध्ये चोरीस गेलेली दुचाकी मोटार सायकल क्रमांक एम एच १२ एन क्यु ६५८३ ही मिळुन आली त्याचेकडे नमुद गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास केला असता त्याने विश्रामबाग सहकारनगर पर्वती पोलीस स्टेशन व मानोरा पोलीस स्टेशन जिल्हा वाशीम या पोलीस स्टेशन कडील गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच सदर आरोपीतांवर यापुर्वी देखील पुणे शहर परीसरात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १ पुणे शहर श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग, श्रीमती रुक्मीणी गलांडे, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश बडाख यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस उप निरीक्षक सौरभ माने व सुनिल रणदिवे, स.पो. फौ. संतोष पागार, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, औचरे, रहीम शेख, कल्याण बोराडे, शरद घोरपडे, अविनाश दरवडे यांनी केली.

Post a Comment

0 Comments