सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर. घरफोडी करणाऱ्या सराईत चोराला सहकारनगर पोलिसांन कडून अटक, आरोपीकडून ३ गुन्हे उघड व ४० हजाराचे सोन्याचे दागिने जप्त.


सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन केले, सहकारनगर पोलिसांनी या संदर्भात, बालाजी नगर धनकवडी येथून एका आरोपीला अटक केली आहे ,
त्याचेकडे अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, व आणखी दोन घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे, आरोपीकडून ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे, आरोपी हा मुळचा ठाणे येथील रहिवाशी असुन तो पुण्यात येवुन घरफोड्या करीत असुन त्याचेवर यापुर्वी ठाणे व पुणे येथील भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

दि.२१/०४/२०२४ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१२५/२०२४ भादवी कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयाचा तपास श्री. सुरेंद्र माळाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे व श्री. उत्तम भजनावळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे व तपास पथकाचा स्टाफ करीत असताना आरोपी नामे १) रोशन शांताराम बंडागळे, वय ३९ वर्षे, रा.  बालाजीनगर धनकवडी पुणे यास ताब्यात घेण्यात आले.

त्याचेकडे अधिक तपास करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याची अंगझडती घेता त्याचे ताब्यात दाखल गुन्हयात चोरीस गेलेले ४०,०००/-रु. कि.चे सोन्याचे दागिने व चाव्यांचा जुडगा मिळुन आल्याने नमुद आरोपीस दाखल गुन्हयात अटक करुन दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. नमुद आरोपीकडे तपास करता त्याने आणखी दोन ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. नमुद आरोपी हा मुळचा ठाणे येथील रहिवाशी असुन तो पुण्यात येवुन घरफोड्या करीत असुन त्याचेवर यापुर्वी ठाणे व पुणे येथील भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्रीमती नंदीनी वग्यानी, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विशाल पवार तसेच सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, सहा. पोलीस उप निरीक्षक बापु खुटवड पोलीस अंमलदार बजरंग पवार, किरण कांबळे, अमोल पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, विशाल वाघ, अमीत पदमाळे, प्रदिप रेणुसे, प्रशांत मुसळे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments