गुन्हे शाखेला माहिती प्राप्त झाली होती की पुणे शहरांमध्ये,बनावट केमिकल ताडीकरीता लागणारे केमिकल विक्री करीत आहेत,
सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी मुंढवा परिसरामध्ये छापा मारून केशवनगर, मुंढवा, पुणे याचेकडे केमिकल / विषारी बनावट ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड (CH) चा साठा आहे अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाले त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा विभाग यांनी सदर ठिकाणी छापा मारून आरोपीला अटक केली आहे,
याप्रकरणी गुन्हे शाखेकडून २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मा वरीष्ठांकडुन माहीती प्राप्त झाली होती की पुणे शहर व परीसरामध्ये काही इसम हे बनावट केमिकल ताडीकरीता लागणारे केमिकल विक्री करीत आहेत, त्याचप्रमाणे नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक व झोनल डायरेक्टर हैद्राबाद यांचेकडून नमुद गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश बांगर याचे विषयी इनपुट प्राप्त झाले होते व ते त्यांनी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांना पुढील कारवाईकामी कळविले होते.
त्या अनुषंघाने दि. २३/०३/२०२४ रोजी सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांना माहीती प्राप्त झाली की मुंढवा परिसरामध्ये रहात असलेला आरोपी प्रल्हाद रंगनाथ भंडारी, वय ६१ वर्षे, रा केशवनगर, मुंढवा, पुणे याचेकडे केमिकल / विषारी बनावट ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड (CH) चा साठा आहे, त्याप्रमाणे सदर ठिकाणी गुन्हे शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांनी छापा कारवाइ करुन आरोपीचे ताब्यातुन १४२ किलो ७५० ग्रॅम वजनाचे ५ पोते एकुण कि. २,९५,५००/- रुचा मुद्देमाल जप्त करुन त्याचे विरुध्द मुंढवा पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. १२२/२४, भा. द. वि. कलम ३२८, ३४, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ अ, ब, क, ड. ई, ६६ क, ड. ८१, ८३, ९० तसेच विष अधिनियमचे कलम २ (अ), ६ अन्वये गुन्हा नोंद करणेत आला.
नमुद गुन्ह्यातील अटक आरोपीकडे कसुन तपास करुन त्याचे कब्जात मिळुन आलेले क्लोरल हायड्रेड
(CH) हे त्याला आरोपी नामे निलेश विलास बांगर, वय ४० वर्षे, रा पिंपळगाव खडकी, कुरकुटे मळा, मंचर जवळ ता- आंबेगाव, जि पुणे याने पुरवविले असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने मा. वरिष्ठांचे आदेशाने सामाजिक सुरक्षा विभागाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे व गुप्त माहीतीदारांकडुन तपास केला असता सदचा आरोपी हा पिंपळगाव खडकी, येथील त्याचे रहाते घराचे परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने तात्काळ सदर ठिकाणी रवाना होवून आरोपी राहते घरामधुन पळून जायचे तयारीत असताना त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याच्याकडे सखोल विचारपुस करुन तपास केला असता माहीती प्राप्त झली की जि अहमदनगर हद्दीतील शेती गट नं. १७७, हरीबाबावाडी, वेल्हाळे, ता संगमनेर, जि अहमदनगर येथे निलेश विलास बांगर हा असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशिरपणे मनुष्याचे जिवीतास हानी पोहोचेल असे बनावट केमिकल / विषारी ताडी तयार करणेसाठी वापरले जाणारे क्लोरल हायड्रेड (CH) पांढरे पिवळसर रंगाची क्रिस्टल पावडर तयार करणेचा अवैध कारखाना असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच सदर ठिकाणी रवाना होवुन तेथे दोन पंचासमक्ष छापा टाकला.
सदर ठिकाणाहुन एकुण २,२१७.५ किलो तयार क्लोरल हायड्रेड (CH) तसेच ते तयार करणेसाठी लागणारे रिअॅक्टर मशिनरी / काचेचे उपकरणे व इतर साहित्य असा सुमारे ५८,४६,०४४/- रुपयेचा मुदेमाल जप्त करुन अवैध कारखाना सिल करण्यात आला असुन सदर दोन्ही आरोपींना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे तसेच सदर आरोपींना मा. न्यायालयाने दिनांक २७/०३/०२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. नमुद गुन्हयाचा पुढील तपास सपोनि राजेश माळेगावे सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत.
सदरची कारवाई श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. प्रविण पवार पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. शैलेश बलकवडे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर, श्री. अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर, श्री, सुनिल तांबे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. सतिश गोवेकर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाकडील वपोनि भरत जाधव, सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहा. पोलीस निरीक्षक बाबर, पोलीस उप निरीक्षक दिगंबर चव्हाण, सहा, पोलीस फौजदार राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार अजय राणे, बाबासाो कर्पे, मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, इरफान पठाण, ओंकार कुंभार, अमेय रसाळ, सागर केकाण, तसेच अमली पदार्थ विरोधी पथक २ कडील पोलीस अंमलदार संदीप जाधव, चेतन गायकवाड, युनिट ५ कडील पोलीस अंमलदार शिवले, कांबळे, शेख, दळवी यांनी केली आहे.
0 Comments