चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर. येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगाराला चंदन नगर पोलिसांकडून अटक.

येरवडा पोलीस स्टेशन येथील रेकार्ड वरील तडीपार इसम मुंढवा रोड, लाल माती ग्राऊंड, वडगाव शेरी पुणे येथे येणार असल्याबाबत
पोलिसांना माहिती मिळाली होतीस त्याच अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला सदर जागेवरून अटक केली आहे,तडीपार आदेशाचा भंग करुन मुदतीपुर्वी कसलीही पुर्व परवानगी न घेता पुणे शहर आयुक्तालयाच्या कार्याक्षेत्रात मिळुन आल्याने त्यास चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेवर चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि न. १४२/२०२४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.


दि.२४/०३/२०२४ रोजी चंदननगर पो. स्टे कडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक तान्हाजी शेगर, व स्टाफ असे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंगकरीत असताना, पोलीस अंमलदार विकास कदम व श्रीकांत कोद्रे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशन पुणे रेकार्ड वरील तडीपार इसम अदिल सय्यद हा जुना मुंढवा रोड, लाल माती ग्राऊंड, वडगाव शेरी पुणे येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.

त्याप्रमाणे नमुद ठिकाणी तपास पथकातील टिम रवाना होवुन सापळा लावुन थांबले असता, काही वेळाने बातमी प्रमाणे एक इसम आला असता, त्यास पोलीस स्टाफचे मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अदिल इफ्तेकार सय्यद, वय २३, रा. संत हॉस्पीटल जवळ, वडगाव शेरी शेवटचा बसस्टॉप, शितळादेवी मंदीराजवळ, वडगाव शेरी पुणे असे असल्याचे सांगितले. त्याचे अभिलेखावर पाहणी केली असता, त्यांस मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-४, पुणे शहर यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्हा हद्दीतुन दोन वर्षासाठी हद्दपार असल्या बाबत निदर्शनास आले. त्यामुळे तो सदर तडीपार आदेशाचा भंग करुन मुदतीपुर्वी कसलीही पुर्व परवानगी न घेता पुणे शहर आयुक्तालयाच्या कार्याक्षेत्रात मिळुन आल्याने त्यास चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेवर चंदननगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि न. १४२/२०२४, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विजय मगर, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. पंडित रेजितवाड, तपास पथक पो.उप. निरीक्षक तान्हाजी शेगर, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोने, महेश नाणेकर, सचिन रणदिवे शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाणे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments