सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर. सिंहगड पोलिसांची कारवाई घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैधरित्या गॅसची चोरी करून लहान आकाराच्या सिलेंडर मध्ये भरून विक्री करणाऱ्या २ आरोपींना अटक, आरोपींकडून लहान व मोठे २८ गॅस सिलेंडर जप्त.

सिंहगड पोलिसांना बातमी मिळाली की काही इसम हे स्वतःच्या फायद्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान आकाराच्या सिलेंडर मध्ये गॅस भरून विक्री करत आहेत, गारवा बिर्याणी दुकानाच्या समोर धायरी पुणे येथील एका रुम मध्ये काही इसम हे अनाधिकृत पणे स्वतःचे आर्थिक फायद्या करीता  गॅस सिलेडर मधुन लोंखडी रिफिल पाईपच्या सहाय्याने रिकाम्या गॅस सिलेडर मध्ये गॅस रिफिल करुन पुन्हा सिल बंद करुन त्यांची विक्री करीत आहेत, पोलिसांनी २ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लहान व मोठे २८ गॅस सिलेंडर एक वजन काटा, नॉब, रेग्युलेटर असलेला गॅस पाईप, पाना, दोन स्कु डायव्हर, असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा लोन करण्यात आला आहे.


दि.२४/०३/२०२४ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तपास पथक कार्यालयात सपोनि सचिन निकम, पोउपनिरी संतोष भांडवलकर, व स्टाफ असे हजर असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गारवा बिर्याणी दुकानाच्या समोर धायरी पुणे येथील एका रुम मध्ये काही इसम हे अनाधिकृत पणे स्वतःचे आर्थिक फायद्या करीता सिंल बंद गॅस सिलेडर मधुन लोंखडी रिफिल पाईपच्या सहाय्याने रिकाम्या गॅस सिलेडर मध्ये गॅस रिफिल करुन पुन्हा सिल बंद करुन त्यांची विक्री करीत आहेत अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठांनी कळविली असता वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन बातमी प्रमाणे खात्री करता सदर ठिकाणी दोन इसम हे त्यांचे पत्र्याचे रुम मध्ये घरगुती सिलबंद गॅस सिलेडर मधुन नॉबच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या लहान गॅस सिलेडर मध्ये रिफिल करीत असताना दिसल्याने सदर ठिकाणी दि.२४/०३/२०२४ रोजी अचानकपणे छापा मारला असता सदर ठिकाणी दोन इसम मिळुन आले त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव १) आशिष अशोक मोरे वय २७ वर्षे रा.धायरी पुणे व २) अमर सुर्यकांत शेडोळे वय-२५ वर्षे रा. गणेशनगर धायरी पुणे असे असल्याचे सांगितले नमुदचे इसम हे घरगुती गॅस हा नॉबच्या सहाय्याने त्यांच्याकडील लहान टाक्यामध्ये रिफिल करुन तो बाजारात अवैधपणे विक्री करीत असल्याने घटनास्थळावर त्याचे जवळ लहान व मोठे २८ गॅस सिलेंडर एक वजन काटा, नॉब, रेग्युलेटर असलेला गॅस पाईप, पाना, दोन स्कु डायव्हर, असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं १७६/२०२४ भा दं वि कलम २८५,३४ तसेच जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ अन्वये दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३, पुणे श्री. संभाजी कदम सहा पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, श्री भिमराव टिळे, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राघवेंद्रसिंह क्षीरसागर, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, यांचे पथकाने केली.

Post a Comment

0 Comments