येरवडा येथील तडीपार आरोपी हा येरवडा परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याच अनुषंगाने पोलिसांनी,मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तेथे जावून संशयीत इसमाला पळून जात असताना पकडले. तडीपार आरोपीवर येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २८/०३/२०२४ रोजी येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना तपास पथकाचे श्रेणी पोलीस उप-निरीक्षक प्रदिप सुर्वे व पोलीस अंमलदार गणपत थिकोळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशनकडील तडीपार आरोपी नामे कुणाल जाधव हा येरवडा परिसरात असल्याची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी तेथे जावून संशयीत इसमाला पळून जात असताना पकडले. त्यास नाव पत्ता विचारता कुणाल उर्फ राजा किसन जाधव वय २४ वर्षे रा चौधरी वस्ती खराडी पुणे असे असल्याचे सांगितले. येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. १७९/२०२४ भादवि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास दि. २९/०३/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. त्याचेबाबत लोणीकंद पोलीस स्टेशनकडील अभिलेखाची पडताळणी केली असता सदरचा आरोपी लोणीकंद पो स्टे गुर नं ९३३/२०२३ भा.दं. वि. कलम ३२५.३२४,३२३,५०४,५०६,३४ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (२), ३ (४) गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी असलेबाबत माहिती प्राप्त झाली.
सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, श्री. विजयकुमार मगर, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. संजय पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आशालता खापरे, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि स्वप्निल पाटील, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअं अनिल शिंदे, सुरज ओंबासे, विठ्ठल घुले, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, यांनी केलेली आहे.
0 Comments