वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर. जुन्या झालेले भांडण मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेवून फिर्यादी यांना धारधार शस्त्र, लोखंडी रॉड, काचेची बाटली याने मारहाण. वानवडी पोलिसांकडून ८ आरोपींना अटक, २ विधीसंघर्षीत बालकांचा समावेश आहे.


फिर्यादी यांना मारहाण प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जुन्या झालेले भांडण मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेवून फिर्यादी यांना धारधार शस्त्र, लोखंडी रॉड, काचेची बाटली यांनी ८ ते १० आरोपीनी मारहाण करण्यात आलेली होती.  फिर्यादी यांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते. वानवडे पोलिसांकडून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे, अटक आरोपींमध्ये २ विधीसंघर्षीत  बालकांचा समावेश आहे.


दिनांक २२/०३/२०२४ रोजी हेवन पार्क येथील जंगलात फिर्यादी यांचे सोबत जुन्या झालेले भांडण मिटवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना बोलावून घेवून फिर्यादी यांना धारधार शस्त्र, लोखंडी रॉड, काचेची बाटली यांनी ८ ते १० आरोपीनी मारहाण करण्यात आलेली होती. त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२९/२०२४ भा. द. वि. कलम ३०७, ५०६ (२), ३२४, ३२३, १४३, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे यांनी तपास पथक प्रभारी पोउनि संतोष सोनवणे व स्टाफ यांना गुन्हयाचे अनुषंगाने मार्गदर्शन करुन सीसीटिव्ही चेकींग, तसेच फिर्यादीकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीचे आधारे आरोर्पीताचा शोध घेवून अटक करणेकामी पथके तयार केली होती. तपासा दरम्यान दाखल गुन्हयातील आरोपी बाबत बातमीदारांकडून माहिती काढून शोध घेवून २४ तासाचे आत गंभीर गुन्हयातील आरोपीत यांना जेरबंद करुन अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपीचे नाव खालील प्रमाणे -

१) यश राजन स्वामी, वय १९ वर्षे रा.स.नं. ५६/५७ आझादनगर झेनसर कॅम्पुटर अॅकॅडमी जवळ, वानवडी पुणे

 २) माधव मुरलीधर घुले, वय १९ वर्षे, रा. स.नं. लक्ष्मीपार्क, वाडकर मळा, महमंदवाडी, हडपसर पुणे 

३) शिवम परशुराम जगताप, वय १९ वर्षे रा. एस.आर.पी.एफ ग्रुप नंबर ०२, २४२ क्वॉर्टरर्स, वानवडी पुणे 

४) यश भारत सहेरीया, वय १९ वर्षे रा. लेन नंबर ०१, आझादनगर, वानवडी पुणे 


५) शंतनू तुकाराम शिंदे, वय २० वर्षे रा. स. नं. ५७, आझादनगर, वानवडी पुणे 

६) सॅम सलोमन मिरपगार, वय २२ वर्षे रा. गल्ली नंबर १०, स. नं. ५७, वानवडी, पुणे

७) अशिष विशाल चव्हाण, वय १९ वर्षे रा. स. नं. ५७, आझादनगर, वानवडी, पुणे

८) स्वराज तुकाराम शिंदे, वय १९ वर्षे रा. श्रेयस अपार्टमेंन्ट समोर, आझादनगर वानवडी पुणे तसेच २ विधीसंघर्षीत बालक

वर नमूद अटक आरोपीत याचेकडे अधिक तपास करता आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदरची कामगिर मा. पोलीस उपआयुक्त परि.-५. पुणे शहर श्री. आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री गणेश इंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय पतंगे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) राजेंद्र करणकोट व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments