गुन्हे शाखेचे युनिट-५ यांच्याकडून सराई तडीपार आरोपीला अटक करण्यात आली आहे सदरची माहिती अशी की, हडपसर शेवाळवाडी येथे एक सराईत गुन्हेगार कमरेला पिस्टल लावून शेवाळवाडी परिसरामध्ये फिरत आहे अशी बातमी गुन्हे शाखा युनिट ५ च्या पथकाला मिळाली , सदर बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांना कळवून, मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा लाऊन शिताफीने पकडुन ताब्यात घेतले, त्यावेळी त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक राऊंड मिळून आल्याने सदर आरोपीच्या विरोधात हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास चालु आहे. नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यास पुणे शहर व पुणे जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
दि.२९/०३/२०२४ रोजी गुन्हे शाखेचे युनिट-५ च्या कार्यक्षेत्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हेगारांकडुन कोणतेही अनुचित प्रकार घडु नये या करीता युनिट-५, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी युनिट कडील पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांचे वेगवेगळ्या टिम तयार करुन हद्दी मध्ये पेट्रोलिंग करत असतांना
सदर पथकांपैकी एका पथकातील पो. अंमलदार नामे प्रताप गायकवाड व अकबर शेख यांना बातमी मिळाली की, मागील ५ महिन्यापासुन पुणे शहर व पुणे जिल्हयातुन तडीपार केलेला गुन्हेगार नामे अभिषेक अनिल भडंगे, रा. हडपसर, पुणे हा पिस्टल बाळगुन आहे व तो कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने शेवाळवाडी बस डेपो येथे वावरत आहे.
त्याप्रमाणे तडीपार आरोपी नामे अभिषेक अनिल भडंगे, वय २२ वर्षे, रा. बंटर हायस्कुलजवळ, गाडीतळ, हडपसर, पुणे यास सापळा लाऊन शिताफीने पकडुन ताब्यात घेतले, त्यावेळी त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल व एक राऊंड असे अग्नीशस्त्र स्वतःची दहशत निर्माण करणेकामी वापरत असल्याचे आढळून आले. म्हणुन त्यास अग्निशस्त्रासह ताब्यात घेऊन त्याचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ आणि १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास चालु आहे. नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यास पुणे शहर व पुणे जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार केले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उपायुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, प्रताप गायकवाड, दया शेगर, विनोद शिवले, अकबर शेख व पल्लवी मोरे यांनी केलेली आहे.
0 Comments