आरोपी यानी नामांकित कंपनीची बनावट सही बनावट सिक्के तयार करून मोठी ऑर्डर मिळाली आहे, असे कंपनीला डुबलीकेट पेपर दाखवून व त्यांना विश्वासात घेऊन बद्दल्यात फिर्यादीचे कंपनी कडुन वेळोवेळी पैसे घेवुन फिर्यादीचे कंपनीस ऑर्डर न देता ३९ लाख ८३ हजार५००/- रुपये रकमेचा अपहार करुन फिर्यादी व कंपनीची आर्थिक फसवणुक केली म्हणून वारजे माळवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
मार्च २०२२ ते डिसेंबर २०२३ रोजी वारजे पुणे या ठिकाणी दामोदर श्रीपती पवार, व त्यांचा मुलगा गणेश दामोदर पवार, दोन्ही रा. भिगवण रोड, बारामती, पुणे या दोघांनी मिळून संगनमताने सुरुवातीला एक नग मिनी कॉम्पॅक्टर मशीन कंपनी कडून घेवुन फिर्यादी यांचा व त्यांच्या कंपनीचा विश्वास संपादन करुन त्यानंतर त्यांचे कंपनीस कमिन्स इंडीया लिमीटेड या कंपनीने एकुण २५ नग मशिन, एकुण किंमत रुपये ८,२८,४१,९००/- रु ची कमिन्स इंडीया लिमीटेड कंपनीची ऑर्डर मिळाल्याचे भासवुन सदर कमिन्स कंपनीची बनावट सही व बनावट शिक्के असलेली बनावट ऑर्डर तयार करुन ती त्यांचे कंपनीला मिळाली असल्याचे सांगुन ती व्हॉटसपद्वारे पाठविली. त्या नंतर ती ऑर्डर फिर्यादीचे कंपनीस देणार आहे असे आश्वासन देवुन त्या बद्दल्यात फिर्यादीचे कंपनी कडुन वेळोवेळी पैसे घेवुन फिर्यादीचे कंपनीस ऑर्डर न देता ३९,८३,५००/- रुपये रकमेचा अपहार करुन फिर्यादी व कंपनीची आर्थिक फसवणुक केली म्हणून वारजे माळवाडी पोलीस ठाणेगु.र.नं. ४८२/२०२३ भादवी ४०६,४२०,४६५,
४६७,४६८,४७१,४७२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
गुन्हा नोंद केल्या पासून सदर गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे गणेश दामोदर पवार वय ४० वर्षे, रा. भिगवण रोड, बारामती पुणे हा त्याचे अस्तित्व लपवून कलबुर्गी, कर्नाटक या ठिकाणी राहत असल्याचे गोपनीय बातमीदाराद्वारे तसेच तांत्रिक विश्लेषनाद्वारे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचा शोध घेणे बाबत वरिष्ठांच्या परवानागिने कलबुर्गी, कर्नाटक राज्य येथे वारजे माळवाडी पोलीसांनी जाऊन शोध घेतला असता आरोपी हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि रणजीत मोहिते हे करत आहेत.
सदरची कामगिरी हि मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रवीणकुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे श्री संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त कोथरूड विभाग श्री भीमराव टेळे, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोज शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रणजीत मोहिते, पोलिस अंमलदर फड, गुजर, हंडाळ यांचे पथकाने केली.
0 Comments