जुन्या भांडणाच्या कारणावरून, अपहरण करून आरोपींकडे असलेल्या हत्याराने व दगडाने, जबर मारहाण केले होते, सदर व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, या गुन्ह्यातील आरोपी ताडीवाला रोड, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला
दि. २२/०२/२०२४ रोजी ताब्यात घेवुन गुन्हयाच्या संबधीने चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचे इतर साथीदार यांनी केल्याची कबुली दिली आहे.
फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दि. १४/०२/२०२४ रोजी फिर्यादी यांचा अल्पवयीन मुलगा यास गुन्हयातील अटक आरोपी नामे १) करण हनुमंत लष्कर वय २१ वर्षे रा. साठेनगर नारपोली, भिवंडी, २) दिनेश मारुती मोरे वय १८ वर्षे रा. सदर ३) चंदन उपेद्र प्रसाद गौड वय २८ वर्षे रा. सदर ४) कैलास खंडु धोत्रे वय ४१ वर्षे रा. सदर ५) आकाश परशुराम जाधव वय २३ वर्षे रा. सदर ६) विशाल विठ्ठल साबळे वय २२ वर्षे रा. सदर यांनी व इतर ३ ते ४ इतर अनोळखी इसम यांनी आपआपसात संगनमत करुन त्यास दिनांक १४/०२/२०२४ रोजी वरळ देवी एल.व्ही. आर. हॉटेलच्या समोरुन अपहरण करुन मोटरसायकल वर घेवुन जावुन त्यास जुन्या भांडणाच्या कारणावरुन त्यांचे कडील हत्याराने व दगडाने जबर मारहाण केल्याने उपचारा दरम्यान तो मयत झाल्याने भिवंडी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३०२/२०२४ भादवि कलम ३०२,१४३,१४४,१४७, १४८, ३०७,३६७,३६४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्हयाचे वेळीचे व्हिडीओ चित्रीकरण व सीसीटीव्ही फुटेजचे स्क्रीन शॉटस प्राप्त झाल्याने त्याचे आधारे नमुद गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना सदरच्या व्हिडीओ चित्रीकरण व सीसीटीव्ही फुटेजमधील स्क्रीन शॉटस् मध्ये दिसणारा आरोपी हा बंडगार्डन पोलीस ठाणे रेकॉर्डवरील आरोपी रामनाथ उर्फ पापा मेमीनाथ सोनावणे वय २२ वर्षे रा.१३ ताडीवाला रोड, पुणे हा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीचे शोध घेत असताना पोलीस अंमलदार बडे, भोकरे यांना सदरचा आरोपी हा शंकर मंदिराजवळ, नदी किनारी, १३ ताडीवाला रोड, पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने तपास पथकाडील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व स्टाफ यांचे मदतीने त्यास दि. २२/०२/२०२४ रोजी ताब्यात घेवुन गुन्हयाच्या संबधीने चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्याने व त्याचे इतर साथीदार यांनी केल्याची कबुली दिली आहे. अनोळखी पाहिजे आरोपीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्पन्न करून पुढील कारवाई करीता भिवंडी शहर पोलीस ठाणे, ठाणे शहर कडील पोलीस पथकाचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ २. पुणे श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग पुणे श्री. संजय सुर्वे बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदिपान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलिस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक यांचे पथकाने केली.
0 Comments