खडकी पोलीस स्टेशन, पुणे शहर.घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या अट्टल ३ आरोपीतांना २४ तासात केले जेरबंद, आरोपींकडून एकुण १२ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.


आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेले रु १ लाख ७० हजार /- रु सोन्याचे दागिणे व गुन्ह्यात वापरलेले १० लाख /- रु.चे चारचाकी स्कॉर्पिओ तसेच १ लाख /- रु.कि.चे, एक अॅटो रिक्षा असे एकुण १२ लाख,७० हजार/- रु.कि.चा. मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . सदर आरोपीतांना गुन्ह्याचे पुढील आधिक तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.


यातील फिर्यादी यांचे राहते घर कुलुप लावुन बंद असताना सदर घराचे कडी कोयंडा तोडुन आतमध्ये प्रवेश करुन २,७०,०००/- रु.कि.चे. सोन्याचे दागिने व ३,५००/- रु रोख रक्कम चोरी केलेबाबत फिर्याद यांनी फिर्याद दिलेने खडकी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशन तपासपथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक आण्णा गुंजाळ व स्टाप असे सदर घटनास्थळ परीसरात सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन तसेच गोपनिय बातमीदारामार्फत बातमी काढली तसेच पोलीस अंमलदार ऋषिकेश दिघे यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, सदर घरफोडी करणारे आरोपी हे तालुका कराड जि.सातारा येथे चोरी केलेल्या माल विक्रीकरीता घेवुन गेले असलेबाबत माहिती मिळाल्याने सदरबाबत. मा. वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिलेने कराड जि. सातारा येथे जावुन बातमीप्रमाणे खात्री करुन आरोपीचा माग काढुन कराड येथुन आरोपी नामे १) अनिल संजय बुट्टेवार वय २८ वर्षे रा, बर्गे वस्ती, चिंबळी गांव, चाकण पुणे २) रोशन अरविंद सोनावले वय २६ वर्षे रा. सदर ३) संदिप हरी इंगळे वय ३६ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देवुन चोरीचा मुद्देमाल इसम नामे दत्तात्रय भीमराव पवार वय ४३ वर्षे रा. कपील गोलेश्वर पंचायत टाकीजवळ तालुका कराड जि.सातारा याचेकडे दिलेबाबत सांगितल्याने सदर इसमांचा शोध घेवुन त्यास देखील ताब्यात घेवुन त्यांचेकडुन चोरीस गेले मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन तसेच अॅटो रिक्षा क्र एम. एच १४ एच एम ७८६२ ही जप्त करण्यात आलेली आहे.

सदर आरोपीकडुन गुन्ह्यातील चोरीस गेले रु १,७०,०००/- रु सोन्याचे दागिणे व गुन्ह्यात वापरलेले १०,००,०००/- रु.चे चारचाकी स्कॉर्पिओ तसेच १,००,०००/- रु.कि.चे, एक अॅटो रिक्षा असे एकुण १२,७०,०००/- रु.कि.चा. मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेली आहे . सदर आरोपीतांना गुन्ह्याचे पुढील आधिक तपासकामी अटक करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती आरती बनसोडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन श्री. गिरीक्षकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ, पोलीस उपनिरीक्षक तानाजी कांबळे पोलीस अंमलदार उध्दव कलंदर, संदेश निकाळजे अतुल इंगळे प्रताप केदारी ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments