कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
कोंढवा पोलीस ठाण्याची हद्दीमध्ये स्मशानभूमी समोर खडीमशीन पोलीस चौकी जवळ अपघाताचा प्रकार असल्याबाबतची खबर सकाळी 09.00 वा. नियंत्रण कक्ष येथून प्राप्त झाली होती. कोंढवा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सदर कॉल चे अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, एक मालवाहतुकीचा कंटेनर त्याचा रजि नंबर mh 14 gd 6919 या वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने त्याची धडक इतर वाहनांना बसून अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदर अपघातात एकूण 8 वाहनांचे नुकसान झालेले आहे. सदरचे अपघातात एक इसम मयत झाला असून सदर इसमा चे नाव प्रशांत कृष्णा चोरे, वय 43 वर्षे, रा धनकवडी, पुणे असे असून, पाच ते सात इसम जखमी आहेत. मयत इसमास ॲम्बुलन्सने ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे. इतर जखमी इसमाना जवळील भारती हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.
अपघात ग्रस्त वाहनांची माहिती पुढील प्रमाणे...
MH 12 DC 3278 pashion
MH 12 ET 9752 CAR
MH 12 JW 8064 PASHION PRO
MH12 MK 9387 SHINE
MH12 TV 4208 TEMPO
MH12 MV 6018 TEMPO
MH12 NE 6501 MAHINDRA CAR
MH12 UK 1449 ROYAL ENFIELD,
या अपघातामध्ये एक स्कूल बस देखील आहे यात ड्रायव्हर किरकोळ जखमी झाले आहे मुलांना काही इजा झालेली नाही,
घटनास्थळावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
0 Comments