समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक ०१/०८/२०२३ रोजी २०.०० वा. ते दिनांक ०२/०८/२०२३ रोजी १०.०० वा चे दरम्यान मुकेश ट्रेडर्स, नानापेठ, पुणे हया बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटरचे लॉक तोडून रोख रक्कम ४,००,०००/- रु. व १०,०००/- रु. किमतीचा सी. सी. टी. व्ही. डी. व्ही.आर मशीन सह एकूण रु ४१००००/- इतक्या किंमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. म्हणुन समर्थ पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि.सं कलम ४५४.४५७,३८० प्रमाणे अज्ञात इसमाविरद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार सहा. पोलीस आयुक्त अशोक घुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/ सुरेश शिंदे, पोनि (गुन्हे)/ प्रमोद वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने तात्काळ तपास सुरू केला.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करित असताना अज्ञात चोरटयांनी दुकानातील सी. सी. टी. व्हीचा डी. व्ही. आर मशीन सोबत घेवून गेल्याने चोरटयांचे चेहरे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे घरफोडी झालेल्या दुकानाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही तपासण्यास तपासपथकातील स्टाफने सुरवात केली. घरफोडी करुन आरोपी पळून गेलेच्या दिशेचे जवळ जवळ १०० च्या वर सी.सी.टी.व्ही फुटेज चेक केले असता, आरोपी हे पायी चालत जाऊन मालधक्का वार्ड पुणे स्टेशन परिसरात गेल्याचे सी.सी.टी.व्ही फुटेजमध्ये दिसुन आले. सदरचे आरोपी यांनी गुन्हा करतांना सर्व प्रकारची योग्य ती काळजी घेतलेली असल्याने आरोपी व त्याचा चेहरा हे निष्पन्न होत नव्हते. सदर आरोपीतामधील एका आरोपीचा चेहरा एक सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आला असता त्या एका फुटेजचा आधार घेवून पोउनि सुनिल रणदिवे, पोअं. प्रमोद जगताप, रोहिदास वाघेरे, रहिम शेख, हेमंत पेरणे, कल्याण बोराडे, शरद घोरपडे यांनी सदर इसमाची पुणे रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेवू लागले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काहीएक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यामुळे पुणे स्टेशन परिसरातील गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर फुटेजमधील दिसत असणारा इसम हा पुणे रेल्वे स्टेशन याठिकाणी पार्सल यार्ड परिसरात थांबलेला आहे. सदर इसमास आरपीएफचे मदतीने ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिल्याने संशय अधिक बळाल्याने सदर इसमास समर्थ पोलीस स्टेशन येथे आणुन कसुन चौकशी केली असता त्याने त्याचे इतर दोन साथीदाराचे मदतीने नानापेठ येथील मुकेश ट्रेडर्स याठिकाणी बंद दुकानाचे आतील व बाहेरील दोन्ही शटरचे लॉक तोडून रोख रक्कम ४,००,०००/- रु. १०,०००/- रु. किमतीचा सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन ही घरफोडी केली असल्याचे कबुल करून त्याने स्वतःचे नाव सुरजीत भुवाल सरोज वय २३ वर्ष. रा. कुंडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश असे सांगितले. तसेच त्याचे दोन साथीदार नामे- १) अजय उदरकुमार सरोज वय- १९ वर्ष रा. कुंडा, प्रतापगड, उत्तरप्रदेश व २) गंगा सरोज रा. उत्तरप्रदेश पुर्ण नाव पत्ता माहिती नसल्याचे सांगितले. अजय कुमार सरोज हा मार्केटयार्ड येथिल आबेडकरनगर पुणे या ठिकाणी असलेबाबत सुरजितने सांगितले. सदर अजय कुमार सरोज याला तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सदर वस्तीमधुन ताब्यात घेतले. सदर ताब्यात असलेले दोन्ही आरोपींची कसून चौकशी करून त्यांच्या कडुन घरफोडी करून चोरून घेवुन गेलेला रु. २३००००/- मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी ही मा. प्रविण पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे शहर, मा. श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुरेश शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पो.स्टे. श्री प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेनुसार समर्थ पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोउनि सुनिल रणदिवे, पोलीस अमलदार सपोफी/ दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, पोहवा / गणेश वायकर, रोहिदास वाघेरे पोना- रहिम शेख, पोअ हेमंत पैरणे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संदिप पवार, अर्जुन कुडाळकर, आरपीएफचे वपो.नि. रघुवशी पुणे आरपीएफ, पोउपनिरी. उबाळे, सपोफी दराडे, पोहवा / प्रशांत बोरसे यांनी केली आहे.
0 Comments