आज दि.09/08/2023 रोजी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणचे चैतन्य सभागृहात, विधीसंघर्षित बालकांच्यासाठी मार्गदर्शन शिबिर,घेण्यात आले. सदर मार्गदर्शन शिबिर ध्यास सामाजिक संस्था या मार्फत घेण्यात आले असून संस्थेचे विधी सल्लागार श्री विजय बाविस्कर व रिहाण शेख यांनी उपस्थित विधी संघर्षित बालक व त्यांचे पालक यांना कायदेविषयक बाबी समजावून विधी संघर्षित बालकांच्या भविष्याबाबत चर्चा केली. तसेच उपस्थित पालकांकडून हमी घेण्यात आले. सदर शिबिरात मुलांच्या कौशल्यबाबत चर्चा करून त्यांना रोजगार निर्मिती बाबत समुपदेशन करण्यात आले.
सदर शिबिरास, उपस्थित बालक व पालक यांना भविष्यात त्यांच्याकडून कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच मुले गुन्हेगारी वृत्तीकडे वळू नये याबाबत समुपदेशन केले आहे.
सदर विधी संघर्षित बालक समुपदेशक शिबिरास शिबिरा हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील 40 ते 45 विधी संघर्षीत बालक व त्यांच्यासोबत 50 ते 55 पालक उपस्थित होते.
सदर शिबिरात आम्ही स्वतः व आमच्या सोबत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संदीप शिवले, महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण गोसावी, ध्यास सामाजिक संस्थेचे विजय बाविस्कर व रीहान शेख यांनी मार्गदर्शन केले. तसेच गोपनीय विभागाकडे अंमलदार शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम शांततेत पार पडला.
सदरचे मार्गदर्शन शिबिर सकाळी 11.25 ते 14.30 वा दरम्यान पार पडला.
रवींद्र शेळके
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर
पोलीस स्टेशन
0 Comments