लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३व्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित


पुणे, रविवार ०६ ऑगस्ट २०२३: सक्षम युवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील आंबेडकरनगर वस्तीमधील मधील गरजू मुला मुलींना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला.
 या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या अंतर्गत १ ली ते १० वी तील मुला मुलींना शालेय साहित्य प्रदान केले.
कार्यक्रमाच्या उपस्थितीत सक्षम युवा सोशल फाउंडेशनच्या सभासद व पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाने महाराष्ट्रातील साहित्यिक आणि सांस्कृतिक धरोहराची संरक्षण करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सक्षम युवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांनी तत्परतेने काम केलं आहे आणि या कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य प्रदान करून त्यांच्या शिक्षणाची मदत केली आहे.

Post a Comment

0 Comments