दिनांक ०५/०८/२०२३ रोजी फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ असे घरी जाण्यासाठी अलंकार चौकाजवळील पीएमटी बसस्टॉपवरून केशवनगर येथे जाणा-या बसमध्ये चढत असताना चार अनोळखी इसमांनी शर्टच्या खिशामध्ये ठेवलेला १०,०००/- रु. किं.चा मोबाईल फोन चोरून नेल्याने फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं.२५३/२०२३ भा.द.वि. कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्हयातील अज्ञात चार आरोपीतांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार मनोज भोकरे, शिवाजी सरक यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पुणे एस. टी. स्टॅण्डसमोर मालधक्काकडे जाणा-या रोडवर असणा-या अंडाभुर्जीच्या हातगाडीजवळ चार इसम थांबलेले असून ते त्यांचे जवळील मोबाईल फोन विकत घेणेबाबत विचारणा करीत असून त्यांचेजवळील मोबाईल फोन हे चोरीचे असल्याचा संशय आहे.
वगैरे मजकुराची बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी रविंद्र गावडे व पोलीस स्टाफ असे बातमीदाराने दिलेल्या बातमीच्या ठिकाणी जावून सदर चार इसमांना ताब्यात घेतले असता त्यांना त्याचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची १) सतीश व्यंकटेश माधगोलू, वय २२ वर्षे, रा. उपलपेटा, जि. हैद्राबाद, राज्य तेलंगणा, २) जगदीश भास्करराव आवला, वय २२ वर्षे राह. गाव. तुरकनाडी वलसा तालुका जीएम वलसा जिल्हा पारथीपुरम राज्य आंध्रप्रदेश, ३) विक्रम शिवनाथ दास, वय २२ वर्षे, रा. उपलपेटा, ता. जि. हैद्राबाद, राज्य तेलंगणा, व ४) गणेश कृष्णा गोड, वय २२ वर्षे, रा. वॉर्ड नं. ११, मकान नं. २१७, बी के बहरा, जि. महासमुंद, राज्य छत्तीसगड त्यांचे ताब्यात एकुण १२ मोबाईल फोन मिळून आल्याने त्यांचे कडे सदर मोबाईल फोन बाबत चौकशी केली असता त्यांनी ते पुणे शहरामधून विविध ठिकाणी पी.एम.पी.एम.एल. बस मधुन चोरी केल्याचे सांगितल्याने सदरचे मोबाईल फोन गुन्ह्याचे कामी जप्त करुन वरील इसमांना बंडगार्डन पो.स्टे.गु.र.नं.२५३/२०२३ भादवि कलम ३७९.३४ या दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असून वरील आरोपातांकडून खालील गुन्हे उघडकीस करण्यात
आले आहेत. १) बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २५३/२०२३ भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे
२) बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २५५/२०२३ ३७९ प्रमाणे
३) बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं. २५६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे ४) येरवडा पोलीस ठाणे गु.र.नं. ५४६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे
आरोपीतांकडून २,१०,०००/- रुपये किंमतीचे एकुण १२ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई ही मा अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग, पुणे, श्री. आर. एन. राजे, बंडगार्डन पो. स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अश्विनी सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, मोहन काळे, अनिल कुसाळकर, संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक व तुळशीराम घडे यांचे पथकाने केली.
0 Comments